शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सोलेंनी दिले होते चौकशीचे आदेश

By admin | Updated: May 14, 2016 03:01 IST

सव्वा दोन वर्षांपूर्वी ठाकरे यांनी महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला

नागपूर : सव्वा दोन वर्षांपूर्वी ठाकरे यांनी महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला असता तत्कालीन महापौर अनिल सोले यांनी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, निवृत्त न्यायाधीश नेमण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक होती. तेव्हापासून राज्य सरकारच्या परवानगीसाठी हे प्रकरण २८ महिने प्रलंबित राहिले. चौकशी लागलीच नाही. त्यानंतरही ठाकरे यांनी वारंवार सभागृहात विचारणा केली मात्र समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. चौकशीला बगल दिली जात होती. शेवटी एप्रिल महिन्यात ठाकरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना स्टार बस घोटाळ्याची सविस्तर माहिती दिली.तत्कालीन महापौर अनिल सोले यांनी सभागृहात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत चौकशीसाठी संमती दिली आहे. स्टार बस संचालनासाठी वंश निमयशी करार करताना अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंत्राटदाराच्या हिताच्या बाबींचा समावेश करण्यात आला. प्रत्येक बसमागे कंत्राटदाराला महिन्याकाठी लाखावर मिळकत होत होती, मात्र, महापालिकेला प्रतिबस दरमहा फक्त ३९५० रुपयांची रॉयल्टी कंत्राटदाराकडून दिली जात होती. नंतरच्या काळात रॉयल्टीही थकविली. कंत्राटदाराने तीन वर्षात बस भंगार केल्या. त्यांची देखभाल दुरुस्ती केली नाही. शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, असे आरोप करीत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी याची चौकशी करून वंश निमयचे संचालक व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वेळोवेळी महापालिका सभागृहात केली होती. (प्रतिनिधी)