शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

हायकोर्टाचा आदेश : जामीन हवाय तर, दोन कोटी जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 9:10 PM

अटकपूर्व जामीन हवा असेल तर, आधी दोन कोटी रुपये जमा करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांना दिला. तसेच, ही रक्कम जमा करण्याची तयारी आहे किंवा नाही याची माहिती येत्या सोमवारी देण्यास सांगितले.

ठळक मुद्देबिल्डर विजय डांगरे यांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अटकपूर्व जामीन हवा असेल तर, आधी दोन कोटी रुपये जमा करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय तुळशीराम डांगरे यांना दिला. तसेच, ही रक्कम जमा करण्याची तयारी आहे किंवा नाही याची माहिती येत्या सोमवारी देण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. डांगरे यांनी फसवणूक व ठार मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. डांगरे यांनी आरक्षित जमिनीवरील प्लॉट्स विकून ग्राहकांची सुमारे सव्वादोन कोटी रुपयांनी फसवणूक केली. हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. त्याची माहिती मिळविण्यासाठी प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे. त्याकरिता डांगरे यांना अटक करणे आवश्यक आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता डांगरे यांना दणका दिला.गत १० जानेवारी रोजी सक्करदरा पोलिसांनी नवीन शुक्रवारी येथील रामूजी बाबुराव वानखेडे (६६) यांच्या तक्रारीवरून डांगरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४ व ५०६-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, डांगरे यांनी सरकारी जमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती वानखेडे यांच्यासह अनेकांना विकली व त्यांच्याकडून वेळोवेळी ५५ लाख २५ हजार रुपये स्वीकारले. जमीन सरकारी असल्याची माहिती झाल्यानंतर वानखेडे यांनी डांगरे यांना पैसे परत मागितले होते. परंतु, डांगरे यांनी त्यांना सहकार्य केले नाही. उलट, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डांगरे यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डांगरे यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, सरकारतर्फे अ‍ॅड. विशाल गणगणे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे