शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कामठी रोडवर गृहप्रकल्पात गुंतवणुकीची संधी

By admin | Updated: January 7, 2017 02:53 IST

वर्धा रोड वा अमरावती रोडच्या तुलनेत कामठी मार्गावर शासनाचे अनेक प्रकल्प आणि विकासात्मक कामे सुरू आहेत.

शासनाचे विविध प्रकल्प : फ्लॅटचे किफायत दर नागपूर : वर्धा रोड वा अमरावती रोडच्या तुलनेत कामठी मार्गावर शासनाचे अनेक प्रकल्प आणि विकासात्मक कामे सुरू आहेत. रविवारी वांजरी येथे शासनाच्या किफायत हाऊसिंग योजनेत १००० फ्लॅट उभारणीचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. याशिवाय उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वेमुळे कामठी रोड वर्दळीचा झाला असून फ्लॅट वा प्लॉट खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. १८ कि़मी.चा आठ पदरी रस्ता विकासाच्या दृष्टीने सरकार कामठी रोडवर फोकस करीत आहे. त्याचे श्रेय नितीन गडकरी यांना जाते. भारतीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडबी चौक ते कन्हानपर्यंत १८ कि़मी. लांबीचा आठ पदरी रस्ता तयार करीत आहे. त्याचे उद्घाटनही झाले आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक ते सदर आणि एलआयसी चौक ते कडबी चौकापर्यंत उड्डाण पूल तयार होणार आहे. वाहनचालकाला कडबी चौकापासून थेट आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत सुलभरीत्या जाता येणार आहे. गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत नेण्याची घोषणा केली आहे. या मार्गावर आंतरराष्ट्रीय शाळा, हॉस्पिटल आणि बाजारपेठा आहेत. डॉ. अजय मेहता यांचे कॅन्सर हॉस्पिटल वांजरी येथे सुरू होणार आहे. वर्धा रोड आणि अमरावती रोडपेक्षा कामठी मार्गावरील प्रॉपर्टी दर २० ते ३० टक्के कमी आहेत. वर्धा रोडवर अनेक निवासी प्रकल्प आहेत. पण तिथे कुणीही राहायला जात नाही. पण कामठी रोडवर दाट लोकवस्ती असल्यामुळे निवासाचा फायदा आहे. उड्डाण पुलामुळे वाहनचालकाला सदरपासून पाच ते सात मिनिटात कुठेही पोहोचता येते.(प्रतिनिधी) बँकांच्या व्याजदरात कपात बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. वर्षभरात १.२ टक्के व्याजदर कमी झाले आहेत. सध्या व्याजदर परवडणारे असून काही महिन्यात ७.५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआय कमी येणार आहे. प्रॉपर्टी खरेदीची हीच योग्य वेळ आहे. सरकार पायाभूत सुविधांवर जास्त भर देत असल्यामुळे लोकांना फायदाच होणार आहे.