शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

६० पैकी केवळ ८ एजंटना केले आरोपी

By admin | Updated: July 7, 2015 02:28 IST

शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या ६० पैकी केवळ ८ एजंटांनाच आतापर्यंत प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

श्रीसूर्या फसवणूक प्रकरण : हायकोर्टात शासनाची माहितीनागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या ६० पैकी केवळ ८ एजंटांनाच आतापर्यंत प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. २८ एजंटना नोटीस तामील झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे. उर्वरित एजंटाना विविध कारणांमुळे अद्याप नोटीस तामील झालेली नाही. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.श्रीसूर्या पीडित ठेवीदार कृती समितीने फौजदारी रिट याचिका दाखल करून श्रीसूर्या फसवणूकप्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत तपास करण्यात यावा, अशी विनंती केली आहे. न्यायालयाने गेल्या तारखेला प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत काय प्रगती झाली याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याने शासनाच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढील सुनावणी १३ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे. प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी प्रचंड निष्काळजीपणा दाखवला आहे. त्यांनी श्रीसूर्या समूहाचा अध्यक्ष समीर सुधीर जोशी व संचालिका पल्लवी समीर जोशी यांना एक महिना उशिरा अटक केल्यामुळे वादग्रस्त संपत्ती लपविण्याला व पुरावे नष्ट करण्याला बराच वेळ मिळाला. जोशी दाम्पत्याला पोलिसांची अप्रत्यक्षरीत्या मदतच झाली. परिणामी पीडित ठेवीदारांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)