नव्या पंचांग वर्षात विवाहाचे केवळ ६४ मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:25 PM2021-03-17T23:25:43+5:302021-03-17T23:26:39+5:30

wedding moments नव्या पंचांग वर्षातही विवाहाचे मुहूर्त फारच कमी निघत असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्या पंचांग वर्षात विवाहयोग्य केवळ ६४ मुहूर्तच सापडत आहेत.

Only 64 wedding moments in the new calendar year | नव्या पंचांग वर्षात विवाहाचे केवळ ६४ मुहूर्त

नव्या पंचांग वर्षात विवाहाचे केवळ ६४ मुहूर्त

Next
ठळक मुद्दे चातुर्मासात आपात्कालीन १८ तर गुरू-शुक्राच्या अस्तकाळात ११ विवाहयोग्य तारखा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या वर्षापासून कोरोना संक्रमणाच्या उदयामुळे सर्वच क्षेत्र लामबंद झाले आहेत. त्याचा सर्वात मोठ्ठा फटका नवदाम्पत्य जीवन सुरू करू इच्छिणाऱ्या विवाहयोग्य वर-वधूस बसला आहे. कोरोना संसर्गाचा प्रकोप पुन्हा एकदा उद्भवल्याने गेल्या वर्षीसारखीच विवाहबाधक स्थिती निर्माण झाली आहे. संकटाचा हा प्रकोप ज्योतिषविद्येतही दिसून येत आहे. त्यामुळेच, नव्या पंचांग वर्षातही विवाहाचे मुहूर्त फारच कमी निघत असल्याचे स्पष्ट होत आहे. नव्या पंचांग वर्षात विवाहयोग्य केवळ ६४ मुहूर्तच सापडत आहेत.

ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितल्याप्रमाणे, नव्या पंचांग वर्षात अर्थात गुढीपाडवा १३ एप्रिल २०२१ ते गुढीपाडवा २ एप्रिल २०२२ पर्यंत शास्त्रानुसार विवाहासाठी केवळ ६४ मुहूर्त येत आहेत. चातुर्मासात शुभकार्य करणे टाळले जाते. मात्र, आपात्कालीन परिस्थितीत विवाह करणे अनिवार्यच असेल तर या चातुर्मासातही दिवस, तिथी व नक्षत्रांच्या दृष्टीने १८ मुहूर्त निघत आहेत. शिवाय गुरू व शुक्राच्या अस्तकाळात एकूण ११ मुहूर्त विवाहासाठी योग्य म्हटले गेले आहेत.

वर्तमान पंचांगातील उरले चार मुहूर्त

गुढीपाडव्यापूर्वी वर्तमान पंचांगातील केवळ चारच मुहूर्त विवाहासाठी योग्य राहिलेले आहेत. त्यात १९ व ३० मार्च आणि १ व ५ एप्रिल २०२१ रोजी विवाहासाठीचे सर्वोत्तम असे दिवस सांगितले जात आहेत.

विवाहयोग्य ६४ मुहूर्त

गुढीपाडवा १३ एप्रिल २०२१ ते गुढीपाडवा २ एप्रिल २०२२ या पंचांग वर्षातील विवाहयोग्य उत्तम असे ६४ मुहूर्त पुढीलप्रमाणे...

एप्रिल - २४, २५, २६, २८, २९, ३० (६ मुहूर्त)

मे - १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २८, ३०, ३१ (१३ मुहूर्त)

जून - ४, ६, १६, १९, २०, २६, २८ (७ मुहूर्त)

जुलै - १, २, ३, १३, १५ (५ मुहूर्त)

नोव्हेंबर - २०, २१, २९, ३० (४ मुहूर्त)

डिसेंबर - ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, ३१ (११ मुहूर्त)

जानेवारी - २०, २२, २३, २४, २६, २७, २९ (७ मुहूर्त)

फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७ (६ मुहूर्त)

मार्च - २३, २५, २६, २८, २९ (५ मुहूर्त)

चातुर्मासातील आपात्कालीन मुहूर्त

ऑगस्ट - १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७ (८ मुहूर्त)

सप्टेंबर - १६ (१ मुहूर्त)

ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४ (९ मुहूर्त)

गुरू-शुक्र अस्तकाळातील अडीअडचणीचे मुहूर्त

फेब्रुवारी - २०२२ - २०, २१, २२, २३, २४, २५ (६ मुहूर्त)

मार्च - २०२२ - ४, ५, ९, १०, २० (५ मुहूर्त)

‘मुहूर्तसिंधू’नुसार आपत्कालीन व अडीअडचणीचे मुहूर्त

‘मुहूर्तसिंधू’ या प्राचीन ग्रंथात गुरू किंवा शुक्र दोघांपैकी एकाचा अस्त व एकाचा उदय काल असताना संकटकाळी मंगलकार्य करण्यास दोष नाही, या वचनानुसार तसेच ‘धर्मशास्त्र विचार मंडळा’च्या कालसुसंगत व आचारधर्म या ग्रंथातील विचारानुसार दिलेले हे आपत्कालीन व अडीअडचणीचे मुहूर्त आहेत. हे मुहूर्त ठरविताना ज्योतिषाचार्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

- डॉ. अनिल वैद्य, ज्योतिषाचार्य

Web Title: Only 64 wedding moments in the new calendar year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न