शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ३०० पैकी ४२ प्रदूषित शहरांनाच बजेटचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : देशासमोर हवामान बदलाचे मोठे संकट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाकरिता २०२० मध्ये देशातील ३०० ...

नागपूर : देशासमोर हवामान बदलाचे मोठे संकट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाकरिता २०२० मध्ये देशातील ३०० शहरांची निवड करण्यात आली आहे. या सर्वच शहरांमध्ये उपाययोजना होणे अपेक्षित असताना, अर्थसंकल्पात फक्त २,२१७ कोटी रुपयांची तरतूद करून देशातील ४२ शहरांमध्येच हे लागू केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे देशातील पर्यावरण, हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पाने पर्यावरणवाद्यांची निराशा केली आहे.

२०२० च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमासाठी ४,४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये वायू प्रदूषणाकरिता केवळ २,२१७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशातील ४२ शहरांमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याकरिता हा निधी वापरला जाणार आहे. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स-२०१२ नुसार जगात हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत असणाऱ्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. यामध्ये वायू प्रदूषण महत्त्वाचे असून ते नियंत्रणामध्ये आणल्यास हवामान बदलाचा सामना करता येणार आहे. कोविडमुळे बजेटमधील तरतूद कमी केली असली तरी, भविष्यात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पर्यावरण, वन, वन्यजीव संरक्षण महत्त्वाचे आहे, असा सूर अनेक पर्यावरणवाद्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ पर्यावरण व खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले, हे बजेट आरोग्य आणि आधारभूत क्षेत्रासाठी चांगले असले तरी, वायू प्रदूषण आणि घनकचरा व्यवस्थापन कमी करण्यासाठी झालेली तरतूद कमी आहे. हवामान बदल आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून देशाचा जीडीपी पाच टक्के कमी होऊ शकतो. वन व वन्यजीव संरक्षण हा सुद्धा मुद्दा देशाचा जीडीपी वाढवू शकतो. त्यावर भर देऊन हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी दुप्पट फंड द्यायला हवा होता, द्यावा, कारण वन, पर्यावरण मंत्रालयाला कमी निधी मिळतो.

राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य श्रीकांत गाडीकर म्हणाले, वातावरणात वेगाने बदल जाणवत असतानाही तरतूद कमी झाली आहे. केवळ राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाकरिता तरतूद मर्यादित न ठेवता सामाजिक अर्थव्यवस्थेचा विचार व्हायला हवा होता. हा सर्वसामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला विषय आहे. बजेटमधील तरतुदी स्वागतार्ह असल्या तरी त्या व्यापक हव्या होत्या. जाता-जाता बजेटमध्ये या विषयाला स्पर्श केल्यासारखे दिसत आहे. उलट यावर अध्ययन करून भरीव तरतूद हवी होती.

विदर्भ पर्यावरण कृती समितीचे सुधीर पालीवाल यांनीही अपुऱ्या तरतुदीवर नाराजी दर्शविली आहे. पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे बजेटमध्ये फारसे लक्ष दिल्याचे दिसत नाही. विकासाची परिभाषा पर्यावरणातून होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हानीच होणार आहे. वीज प्रकल्पांमध्ये पूर्वी आयात केलेला कोळसा वापरला जायचा. त्यातून राख कमी निघायची. परंतु आता सर्रास स्थानिक कोळसा वापरला जात असल्याने प्रदूषण वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

...

स्वायत्त संस्थांच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या पाच स्वायत्त संस्थांच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाली आहे. यात जीबी पंत हिमालयीन पर्यावरण आणि विकास संस्था, भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद, भारतीय वनव्यवस्थापन संस्था, इंडियन प्लायवूड उद्योग संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि भारतीय वन्यजीव संस्था या संस्थांचा यात समावेश होतो. २०२० च्या अर्थसंकल्पामध्ये या संस्थांना ३४० कोटी देण्यात आले होते. यंदा या पाचही संस्थांसाठी ३०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

...