शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

एक रोहित्र- एक वीज जोडणी योजना कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:05 IST

उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी देणे सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील २ हजार ८१४ वीज जोडण्या देत कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्दे एचव्हीडीएस अंतर्गत विदर्भातील २८१४ कृषीपंपांना वीज जोडण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्चदाब वितरण प्रणाली योजने (एचव्हीडीएस) अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणी देणे सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत विदर्भातील २ हजार ८१४ वीज जोडण्या देत कृषिपंपांना शाश्वत वीजपुरवठा मिळणे सुरू झाले आहे.शेतकऱ्यांना योग्य दाबाचा आणि विश्वसनीय वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा तथा नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त एक किंवा दोन कृषिपंपांना वीज जोडण्या दिल्या जात असल्याने विविध कारणांमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या त्रासापासून शेतकऱ्यांची कायमची सुटका झाली आहे.या योजनेंतर्गत मागील चार महिन्यात विदर्भातील २ हजार ८१४ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून त्यासाठी २ हजार ७७१ वितरण रोहित्रांसोबतच तब्बल २ हजार ३६५ किमी लांबीची उच्चदाब वीज वाहिनीही उभारण्यात आली आहे. सोबतच ९ हजार २८२ ठिकाणी रोहित्रे उभारण्यासाठी आवश्यक सुविधा तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे.उच्चदाब वितरण तंत्र सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून १० ते १५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. सोबतच आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीजहानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य आहे. यात उच्च दाबाच्या वाहिन्या टाकून लघुदाब वाहिन्यांची संख्या मर्यादित ठेवत शेतकऱ्यांना पुरेशी वीज देता येणे शक्य होत आहे.नागपूर परिक्षेत्रांतर्गत एचव्हीडीएस योजनेची सद्यस्थितीजिल्हा          कार्यान्वित रोहित्रे         वीज जोडण्याअकोला          ३३१                         २१३बुलढाणा        ४४५                       ४५५वाशिम           ३१६                       ३६०अमरावती       ९९                        १०५यवतमाळ       ३४६                     ३७६चंद्रपूर             १५४                     १३२गडचिरोली      १५०                     १४२भंडारा            २१९                     २१९गोंदिया            २०५                   २०६नागपूर            ३६५                    ३६६वर्धा                 १४१                   १४१एकूण           २७७१               २८१४

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी