शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

विदर्भात कोरोनाचे एक लाख रुग्ण; १८८ दिवसात गाठला रुग्णसंख्येचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:28 AM

ऑगस्ट महिन्यात तब्बल ४४५९८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ५४,९२१ झाली. गेल्या १५ दिवसात ४७,५५० रुग्णांची वाढ झाल्याने ही रुग्णसंख्या आत १०२४७१ वर गेली आहे

ठळक मुद्देदर तीन दिवसात १० हजार पार

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. १८८ दिवसात एक लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी एकूण रुग्णांची संख्या १०२४७१वर पोहचली. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात ४४५९८ रुग्णांची नोंद झाली असताना मागील १५ दिवसातच ४७,५५० नव्या रुग्णांची भर पडली. विदर्भात, पहिले १० हजार रुग्ण गाठायला १३३ दिवसाचा कालावधी लागला होता, परंतु १० सप्टेंबरपासून सलग तीन दिवसानी १० हजार रुग्णांची भर पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात तर सर्वात कमी रुग्णांची नोंद वर्धा जिल्ह्यात झाली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदर्भात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात के वळ २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. एप्रिल महिन्यात २९४ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ३६५ झाली. मे महिन्यात १३६२ रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या १७२७ झाली. जून महिन्यात २७९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ४५२६ झाली. जुलै महिन्यात १०३२३ रुग्णांंची वाढ झाल्याने रुग्णसंख्या १४८४९ वर पोहचली. ऑगस्ट महिन्यात तब्बल ४४५९८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ५४,९२१ झाली. गेल्या १५ दिवसात ४७,५५० रुग्णांची वाढ झाल्याने ही रुग्णसंख्या आत १०२४७१ वर गेली आहे

पहिले १० हजार रुग्ण गाठायला लागले १३३ दिवसकोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी नागपुरात झाली. पहिल्या १० हजार कोरोनाबाधितांचा टप्पा ओलांडायला १३३ दिवसाचा कालावधी लागला. परंतु आंतर जिल्हा वाहतुकीवरील प्रतिबंध हटविण्यात आल्याने १६ दिवसातच १० हजार रुग्णांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्येचा हा टप्पा गाठायला आठ दिवस आणि नंतर पाच दिवस लागले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चार दिवसातच १० हजार रुग्णांची भर पडली. आता हा कालावधी आणखी कमी होऊन तीन दिवसावर आला आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस