शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

नागपुरात टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 8:52 PM

भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघात घडला.

ठळक मुद्देदुचाकीला मागून धडक : एक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघात घडला.वैभव आणि पंकज चुलते पुतणे असून ते कलकुही खापरी गावातील रहिवासी होय. मिहान प्रकल्पामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे गावातील मंडळी खापरी पुनर्वसन भागात राहायला गेली आहे. पंकज आणि त्याचा काका वैभव यांचे कुटुंबीय देखील पुनर्वसन वस्तीत राहायला गेले आहे. मात्र, जुने घर आणि तेथील साहित्य बघण्यासाठी रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जुमळे काका-पुतण्या दुचाकीने त्यांच्या जुन्या वस्तीत जात होते. मिहान उड्डाण पुलावर मागून वेगात आलेल्या टँकर क्रमांक एमएच ३१/ सीक्यू ३८८१ च्या चालकाने जुमळेच्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे पंकज आणि वैभव खाली पडले. डोक्याला जबर मार बसल्याने पंकज गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी पंकजला मृत घोषित केले. उपचारानंतर वैभवने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी टँकरचालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू