नागपुरात टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:52 IST2019-02-25T20:52:02+5:302019-02-25T20:52:36+5:30
भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघात घडला.

नागपुरात टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव टँकरचालकाने मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर, एक जबर जखमी झाला. पंकज शंकर जुमळे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, जखमीचे नाव वैभव शेषराव जुमळे (वय ३२) आहे. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास खापरी उड्डाण पुलावर हा अपघात घडला.
वैभव आणि पंकज चुलते पुतणे असून ते कलकुही खापरी गावातील रहिवासी होय. मिहान प्रकल्पामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे गावातील मंडळी खापरी पुनर्वसन भागात राहायला गेली आहे. पंकज आणि त्याचा काका वैभव यांचे कुटुंबीय देखील पुनर्वसन वस्तीत राहायला गेले आहे. मात्र, जुने घर आणि तेथील साहित्य बघण्यासाठी रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जुमळे काका-पुतण्या दुचाकीने त्यांच्या जुन्या वस्तीत जात होते. मिहान उड्डाण पुलावर मागून वेगात आलेल्या टँकर क्रमांक एमएच ३१/ सीक्यू ३८८१ च्या चालकाने जुमळेच्या दुचाकीला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे पंकज आणि वैभव खाली पडले. डोक्याला जबर मार बसल्याने पंकज गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी पंकजला मृत घोषित केले. उपचारानंतर वैभवने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी टँकरचालकाचा शोध घेतला जात आहे.