लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती वाद विकोपाला गेल्यामुळे बहीण आणि जावयाने हातबुक्कीने केलेल्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. सलीम शेख जीमल शेख (वय ५५) असे मृताचे नाव आहे. सलीम कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमाता नगरात राहत होते. त्यांची बहीण आणि जावयासोबत त्यांचा अनेक दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. सलीमची बहीण फिरोजा आणि जावई शेख सय्यद या दोघांनी सलीमला बेदम मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात घरगुती भांडणातून मारहाण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:07 IST