शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'दीड किलो सोने लुटले..' सराफा व्यावसायिकाचा लुटेचा बनाव पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा, स्वतःवरच केला चाकूचा वार

By नरेश डोंगरे | Updated: October 6, 2025 19:01 IST

दोन कोटींच्या इन्शुरन्ससाठी झोल : रेल्वे पोलिसांनी केली पोलखोल

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन कोटींचा इन्शुरन्स मिळविण्याच्या लालसेने सराफा व्यावसायिकाने स्वतःवर चाकूचा वार करवून घेत दरोड्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांच्या चौकशीत त्याचे पितळ उघडे पडले. त्यामुळे लखलखत्या झवेरी बाजारात राहणाऱ्या एका व्यावसायिकावर रेल्वेपोलिसांच्या कोठडीत मुक्काम करण्याची वेळ आली. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाचा नमुना ठरलेल्या या प्रकरणाची रेल्वेच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सागर पारेख (वय ४०) असे या बनावट दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचे नाव आहे. तो मुंबईच्या झवेरी बाजारातील आरबी ज्वेलर्सचा भागीदार आहे. दसरा-दिवाळीत मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने सोन्या-चांदीला आणखीनच झळाळी येते. देशभरातील मोठे व्यावसायिक अन्य बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचा पुरवठा करतात. आरोपी पारेख हा सुद्धा आपल्या एका साथीदारासह मुंबईहून ठिकठिकाणच्या सराफा व्यापाऱ्यांना सोने विकण्यासाठी निघाला होता. २९ सप्टेंबरला जबलपूरहून सीएसएमटी गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये बसून तो मुंबईकडे निघाला. मुंबईत पोहोचल्यानंतर त्याने रेल्वे पोलिस ठाण्यात दरोड्याची तक्रार नोंदविली. धावत्या गाडीत चाकूचा वार करून अज्ञात आरोपींनी आपल्या जवळचे दीड किलो सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे तक्रारीत नमूद केले. घटनास्थळ खंडवा (एमपी) परिसरात असल्याने त्याचा तपास रेल्वेच्या गुन्हे गुप्त वार्ता शाखा, जीआरपी खंडवा आणि भुसावळ करू लागले. फिर्यादी पारेख आणि साथीदारांच्या बयाणातील विसंगती संशयास्पद ठरल्याने आरपीएफ, जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी पारेखसह साथीदारांचे मोबाईलचे सीडीआर आणि अन्य तांत्रिक विश्लेषण करून घेतले. नंतर कसून चौकशी केल्याने शनिवारी त्याने हा दरोडा घडलाच नाही, स्वतःच तो घडवून आणल्याची कबुली दिली. 

पोलिस तपासात गुंततील आणि नंतर आपल्याला आयतीच दीड ते दोन कोटींची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून मिळेल, असा पारेखचा होरा होता. त्यामुळे हा गुन्हा केल्याचेही त्याने आरपीएफ, जीआरपीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

घबाड साथीदाराकडे, तो रेल्वे पोलिसांकडे

रचलेल्या कटानुसार कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर पारेखने साथीदार प्रवीणकुमार (वय ३५, रा. सिरोही, राजस्थान) याला बोलावून घेतले. १ किलो, ६०० ग्रॅम वजन असलेल्या ५२ सोन्याच्या बांगड्या आणि ३५ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ कोटी, ८२ लाखांचा ऐवज प्रवीणला सोपविला. त्यानंतर स्वतः मुंबईत पोहोचून सीएसएमटी रेल्वे ठाण्यात कथित दरोड्याची तक्रार नोंदवली.

मास्टर माईंडसह चौघे गजाआड

आरपीएफचे निरीक्षक प्रकाशचंद्र सेन यांच्या नेतृत्वातील पथकाने या कथित दरोड्याचा छडा ७२ तासांत लावून प्रकरणाचा मास्टर माईंड सराफा व्यावसायिक सागर पारेख तसेच साथीदार संजय कुमार (वय २७, रा. पाली, राजस्थान; सध्या रा. मुंबई), प्रवीण कुमार (वय ३५, रा. सिरोही, राजस्थान; सध्या रा. दिवा ईस्ट, ठाणे) आणि राकेश जैन (वय ५३, रा. मलबार हिल्स, मुंबई) यांना अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Goldsmith's fake robbery: Insurance plot foiled, self-inflicted wound exposed.

Web Summary : A Mumbai jeweler staged a robbery, even wounding himself, to claim insurance money. Police investigation revealed the deceit. He and accomplices are arrested after staging the theft of gold jewelry.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंnagpurनागपूरrailwayरेल्वेPoliceपोलिस