सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले

By योगेश पांडे | Updated: November 13, 2023 14:43 IST2023-11-13T14:42:10+5:302023-11-13T14:43:05+5:30

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

old woman lost worth 3 lakh of gold in e-rickshaw | सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले

सोन्याच्या खरेदीसाठी आल्या अन् सात तोळे सोने गमावले

नागपूर : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या खरेदीसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या पर्समधील सात तोळे सोने अज्ञात महिलांनी चोरले. ई-रिक्षात बसलेल्या महिलांनी ही चोरी केली. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना छडली.

भारती जय शाह (६३, गोकुल सोसायटी, बोरगाव) या खरेदीसाठी रात्री साडेआठ वाजता सराफा बाजारात गेल्या होत्या. त्यांना तेथून गांधीबाग हॅडलूम बाजाराजवळ जायचे होते. त्यांनी त्यामुळे सराफा बाजारातील हक ज्वेलर्ससमोरील एक ई-रिक्षा केला. त्यात तीन महिलादेखील बसल्या होत्या. महिलांनी भारती यांचे लक्ष नसताना लहान पर्स उडवली. त्यात २७ ग्रॅम सोन्याचा गोफ व ४२ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा असा २.८० लाखांचा मुद्देमाल होता. शाह यांना पर्स चोरी गेल्याची बाब कळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात महिलांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: old woman lost worth 3 lakh of gold in e-rickshaw