शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी कामे करत नसल्याची खंत

By admin | Updated: April 24, 2016 03:08 IST

माझ्याकडे जबाबदारी असलेल्या मंत्रालयांकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. परंतु अधिकारी हव्या त्या गतीने कामच करत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.

नितीन गडकरी : राज्यात लवकरच ‘ई-रिक्षा’ला मान्यता मिळणारनागपूर : माझ्याकडे जबाबदारी असलेल्या मंत्रालयांकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. परंतु अधिकारी हव्या त्या गतीने कामच करत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. विकास होण्यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता असते व त्यासाठी संपूर्ण प्रणालीलाच गती देण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी कामे करण्यावर भर द्यावा, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. नागपुरातील टिळक पत्रकार भवनात त्यांची पत्रपरिषद झाली. यावेळी त्यांनी विविध विकास कामांबाबत माहिती दिली.देशातील काही राज्यांनी ‘ई-रिक्षा’ला मान्यता दिली असून महाराष्ट्रात मात्र याबाबतच्या कायद्याला संमती मिळालेली नाही. याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. यासंदर्भात लवकरच आदेश निघेल, असे आश्वासन रावते यांनी दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५,५६० किलोमीटर इतकी होती. केंद्रातील सत्ताबदलानंतर आतापर्यंत महाराष्ट्रात १५,८९९ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामास मंजुरी मिळाली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. (प्रतिनिधी)रस्ते अपघात कमी करणारदेशात मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात ही चिंतेची बाब आहे. देशात दरवर्षी दीड लाखांहून अधिक नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो ही बाब मनाला चटका लावून जाते. रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी रस्ते अपघातांच्या जागांची नोंद करण्यात येत असून तेथील रस्त्यांची डागडुजी, वळणांचा धोका कमी करणे इत्यादी उपाययोजना करण्यात येतील. राष्ट्रीय महामार्गांवरील अपघाताची स्थळे शोधण्यात आली आहेत. रस्ते अपघातांची संख्या ५० टक्क्यांहून तरी कमी व्हावी, असा आमचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.‘एआयबीपी’मुळे राज्यातील सिंचनक्षमता वाढणारकेंद्र सरकारने राष्ट्रीय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘एआयबीपी’अंतर्गत (इमिजिएट इरिगेशन बेनिफिट प्रोजेक्ट) ८० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘एआयबीपी’अंतर्गत राज्यातील २८ प्रकल्पांचा समावेश असून विदर्भातील गोसेखुर्ददेखील यातील एक प्रकल्प आहे. या २८ प्रकल्पांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील २५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासन व केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.‘सागरमाला’ंमुळे घटणार मालवाहतुकीचा खर्चदेशांतर्गत मालवाहतुकीचा खर्च जास्त असून जलवाहतुकीच्या माध्यमातून याला कमी केले जाऊ शकते. सागरमाला कार्यक्रमांतर्गत मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी बहुआयामी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येईल. सागरमाला कार्यक्रमांतर्गत देशात २८ महाप्रकल्प उभारण्यात येत असून यामाध्यमातून पायाभूत संरचना, उद्योग व बंदरे इत्यादी क्षेत्रांत ९५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, असेदेखील गडकरी यांनी सांगितले. वर्ध्यातील ‘ड्रायपोर्ट’चे पुढील महिन्यात उद्घाटन होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.वेगळ्या विदर्भावर मौनवेगळ्या विदर्भावरून राज्यातील राजकारण तापले आहे. वेगळ्या विदर्भासंबंधातील केंद्राचे धोरण काय आहे याबाबत गडकरी यांना विचारणा करण्यात आली असता या मुद्यावर अगोदर अनेकदा उत्तर दिले आहे, असे म्हणून त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले.