शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे कब्जा आंदोलन

By admin | Updated: April 24, 2016 03:13 IST

गोसेखुर्द प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी गोसेखुर्द गावातील शेतकऱ्यांनी २८ वर्षांपूर्वी जमिनी दिल्या होत्या.

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती : मागण्या पूर्ण करण्याची मागणीनागपूर : गोसेखुर्द प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी गोसेखुर्द गावातील शेतकऱ्यांनी २८ वर्षांपूर्वी जमिनी दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना शासनाने अजूनही पुनर्वसन अनुदान मोबदला, २०१३ च्या पॅकेजचा लाभ दिलेला नाही. म्हणून गोसेखुर्द, गोसेबुजरुक गावच्या शेतकऱ्यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची खुली जागा व वसाहतीमधील खुल्या क्वार्टरचा ताबा घेण्यासाठी कब्जा आंदोलन २२ एप्रिलला गोसेखुर्द कर्मचारी वसाहतीत करण्यात आले.२२ एप्रिल गोसेखुर्द प्रकल्पाचा भूमिपूजन दिन असतो. या वर्धापनदिनी प्रकल्पग्रस्तांनी गोसेखुर्द गावातून मोर्चा काढून कर्मचारी वसाहत व कार्यालयावर नेला. शासन आम्हाला मोबदला, पुनर्वसन, अनुदान पॅकेज देत नाही तर कर्मचारी वसाहतीमधील क्वार्टर व खुल्या जागा देण्यात यावा, ही मागणी घेऊन वसाहतीवर कब्जा करण्याच्या हेतूने शेकडो प्रकल्पग्रस्त मोर्चाने गेले. पवनी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना ताब्यात घेऊन अटक केली व सायंकाळी राजीव गांधी टेकडीवर सोडून दिले. १०० पेक्षा जास्त स्त्री-पुरुष प्रकल्पग्रस्तांना यावेळी अटक करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता पुन्हा धरणावर नारे-निदर्शने करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने नायब तहसीलदार कांबळे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व विलास भोंगाडे, समीक्षा गणवीर, रमेश भांडारकर, भीमराव भिमटे, सोमेश्वर भुरे, गुलाब मेश्राम, दादा आगरे यांनी केले. (प्रतिनिधी)