शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वेधशाळेची घोषणा; मान्सून विदर्भात दाखल : अकाेल्यात विक्रमी पाऊस तर नागपूरसह अमरावतीतही मुसळधार

By निशांत वानखेडे | Updated: May 28, 2025 19:09 IST

वादळ, मेघगर्जनेसह जाेरात बरसल्या सरी : मान्सून विदर्भात दाखल

नागपूर : हवामान विभागाने बुधवारी विदर्भात मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घाेषणा केली आहे. आता ताे गडचिराेलीत पाेहचल्याची घाेषणा वेधशाळेतर्फे करण्यात आली. मात्र घाेषणेच्या एक दिवसापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांना चांगलाच तडाखा दिला. मंगळवारी रात्री ते बुधवार सकाळपर्यंत अकाेल्यात विक्रमी पाऊस काेसळला, तर अमरावतीलाही पावसाने झाेडपले. बुधवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने नागपूरकरांचीही दाणादाण उडवली. 

अकाेल्यात मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने मे महिन्यातील पावसाचा तब्बल सव्वाशे वर्षाचा विक्रम माेडित काढला. बुधवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत येथे १४०.७ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे, जी आतापर्यंत मे महिन्यातील व २४ तासातील सर्वाधिक नाेंद हाेय. यापूर्वी १८९३ साली मे महिन्यात १०४.१ मि.मी. पाऊस बरसला हाेता. २४ तासाच्या विक्रमात २८ मे १९४३ साली ४४.७ मि.मी. पाऊस झाला हाेता.

दुसरीकडे बुधवारी सकाळपर्यंत अमरावतीत ४५.२ मि.मी. पाऊस बरसला. यामुळे बऱ्याच वस्त्या जलमय झाल्याची माहिती आहे. या दाेन्ही शहरात बुधवारी मात्र दिवसभर पावसाने शांतता बाळगली. दुसरीकडे दिवसभर उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना सायंकाळी मात्र पावसाने धाे-धाे धुतले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आकाशात जमलेल्या काळ्याभाेर ढगांनी संपूर्ण अंधार पसरला हाेता. ५.३० वाजता साेसाट्याचा वारा, वादळ आणि ढगांच्या गडगडाटासह जाेरदार सरी बरसल्या. अर्धा-पाऊण तास झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. अचानक झालेल्या पावसामुळे चाकरमाण्यांची तारांबळ उडाली.

टॅग्स :Vidarbhaविदर्भRainपाऊसmonsoonमोसमी पाऊसAmravatiअमरावतीAkolaअकोलाnagpurनागपूर