शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणजी-आनंदजींच्या संगीताचा ‘ओ साथी रे’

By admin | Updated: September 15, 2014 01:02 IST

कल्याणजी आनंदजी या जोडगोळीने आतापर्यंत अनेक चित्रपटगीतांना चाली लावल्या आणि त्या लोकप्रियही झाल्या, नव्हे कल्याणजी - आनंदजी यांचे संगीत असलेला प्रत्येक चित्रपटच त्या काळात तुफान चालला.

स्वरमधुरा संस्थेचे सादरीकरण : सुरेल गीतांनी रंगलेला कार्यक्रम नागपूर : कल्याणजी आनंदजी या जोडगोळीने आतापर्यंत अनेक चित्रपटगीतांना चाली लावल्या आणि त्या लोकप्रियही झाल्या, नव्हे कल्याणजी - आनंदजी यांचे संगीत असलेला प्रत्येक चित्रपटच त्या काळात तुफान चालला. यात त्यांच्या संगीताचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. कायम साधेपणाने वावरणाऱ्या आणि कुणाविषयीही असूया न बाळगणाऱ्या या संगीतकारांनी अजरामर गीते रसिकांना दिलीत. त्यांच्यावर शंकर-जयकिशन यांच्या संगीताचा प्रभाव होता पण त्यांनी दिलेले संगीत स्वतंत्र प्रतिभेचे आणि रसिकांच्या काळजाला हात घालणारे होते. विविध भावनांना संगीतातून व्यक्त करताना त्यांनी निर्माण केलेली गीते प्रत्येक पिढीला रिलेट करीत जाणारी आहेत. कल्याणजी आणि आनंदजी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वरमधुरा संस्थेच्यावतीने आज सायंटिफिक सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘ओ साथी रे...’ या शीर्षकाने झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना गायक राजेश दुरुगकर यांची होती. एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने काही चित्रपटातील प्रसंग आणि गीतांचे प्रसंग प्रदर्शित करण्यात येत असल्याने आपण थेट या जोडगोळीने संगीत दिलेला चित्रपटच पाहत आहोत, असा भास निर्माण झाला. डॉ. मनोज साल्पेकर यांचे निवेदन कार्यक्रमाचा रंग अधिक गडद करणारे होते. त्यात सारेच गायक कलावंत ताकदीचे आणि गाण्याचा आशय समजून मूडने गाणारे असल्याने कार्यक्रम रंगतदार ठरला. काही चित्रपटांच्या प्रसंगाच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि निरंजन बोबडे यांनी ‘मेरे देश की धरती....’ हे गीत सादर करून प्रारंभीच रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या. त्यानंतर राजेश दुरुगकर आणि श्रद्धा जोशी यांनी ‘हमसफर मेरे हमसफर’ हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. गौरी परसटवार यांनी ‘छोटी सी उमर मे...’ या गीताने वन्समोअर घेतला. त्यानंतर राजेश दुरुगकर यांनी ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे...., वक्त करता जो वफा...’ ही गीते सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. सारेच गायक कसलेले असल्याने या कार्यक्रमातले प्रत्येक गीत वन्समोअर घेत होते. पण काही वेळेला रसिकांची मागणी पूर्ण करणे शक्य होत नव्हते. याप्रसंगी ‘दिल तो हे दिल, परदेसीयों से ना अखिया मिलाना, मोरे घर आयो सजना, तुने किसीसे कभी प्यार किया’ आदी अनेक गीते सादर करण्यात आली. (प्रतिनिधी)