शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वाघांची संख्या वाढली

By admin | Updated: July 17, 2016 01:39 IST

काही दिवसापूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

सुधीर मुनगंटीवार : झाडे वाचवा, आयुष्य वाचवाचा संदेश नागपूर : काही दिवसापूर्वी करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेत महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यात नागपूर परिक्षेत्रातील ३५० किलोमीटर परिसरात ३५० वाघ आढळून असल्याची माहिती राज्याचे वित्त अणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी दिली. सिव्हिल लाईन येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित अखिल भारतीय उदबत्ती उत्पादक संघातर्फे आयोजित कार्यक्रमाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. वाघामुळे वनसृष्टीचे चक्र कायम आहे. वाघ आहेत तिथे वन आहे तर जिथे वन आहे, तिथे पर्यावरण आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन दिनी २९ जुलै २०१६ रोजी राज्यातील मुख्य कार्यक्रम नागपुरात घेतला जाणार आहे. यावेळी वाघाचे चिन्ह असलेले डाक तिकीट जारी केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पर्यावरण संवर्धनासाठी ‘झाडे वाचवा, आयुष्य वाचवा’असा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. प्रदूषणमुक्त वातावणासाठी वसुंधरायुक्त सृष्टी निर्माण करण्याची गरज असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. प्रारंभी त्यांनी उदबत्ती उत्पादक संघातफें आयोजित प्रदर्शनाचे अवलोकन करून शुभेच्छा दिल्या. या व्यवसायामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याला मदत होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय उदबत्ती संघाचे अध्यक्ष दीपक ठकराल व सचिव आसीफ माकडा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)