विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या १० हजाराजवळ, मृतांची संख्या २६९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:33 AM2020-07-22T11:33:00+5:302020-07-22T11:33:21+5:30

नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे.

The number of corona patients in Vidarbha is close to 10,000, the death toll is 269 | विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या १० हजाराजवळ, मृतांची संख्या २६९

विदर्भातील कोरोना रुग्णसंख्या १० हजाराजवळ, मृतांची संख्या २६९

Next
ठळक मुद्दे२६६ रुग्णांची भर, चौघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावातील या चार महिन्यात रुग्णसंख्या १० हजाराजवळ पोहचली आहे. मंगळवारी यात २६६ रुग्णांची तर चार मृत्यूची भर पडली. रुग्णसंख्या ९७४३ झाली असून, मृतांची संख्या २६९ वर पोहचली आहे. नागपूर, अमरावती व बुलडाण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये नागपुरात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे.  मंगळवारी पुन्हा शंभरावर रुग्णसंख्या गेली. १४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, तीन मृत्यूची नोंदही झाली आहे. एकूण बाधितांची संख्या ३१७१ तर मृतांची संख्या ५८ झाली आहे. १९८१ रुग्ण बरे झाले असून, ११३२ रुग्ण उपचार घेत आहेत. अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात झपाट्याने रुग्ण वाढले.  ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १४०२ झाली आहे. ८६४ रुग्ण बरे झाले असून, ४९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

बुलडाण्यातही रुग्ण वाढताना दिसून येत आहे. ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, बाधितांची संख्या ७८६ झाली आहे. ४३० रुग्ण बरे झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या ५९४ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ११ रुग्ण व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३५४ तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७३ झाली आहे. अकोल्यात रुग्णसंख्या मंदावली आहे. १२ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची २१८४ वर पोहचली आहे. विदर्भाच्या इतर पाच जिल्ह्यात पाचच्या आत रुग्णांची नोंद झाली. यात गोंदिया जिल्ह्यात दोन, भंडारा जिल्ह्यात तीन, वर्धा जिल्ह्यात चार, वाशीम जिल्ह्यात एक तर चंद्रपूर जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.



नागपुरात सायबर गुन्हेगारीत झपाट्याने वाढ

साडेसहा महिन्यात २,२७५ तक्रारी : आॅनलाईन फसवणुकीचे सर्वाधिक प्रकार
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. अवघ्या सहा महिन्यांमध्ये नागपुरात सायबर शाखेत २,२७५ तक्रारी आल्या आहेत. त्यावरून याचा प्रत्यय यावा.
लॉकडाऊनमुळे आॅनलाईन व्यवहाराला प्रत्येक जण प्राधान्य देत आहे. बहुतांश व्यक्ती आर्थिक व्यवहारही आॅनलाईनच उरकत आहेत. कामधंदे बंद झाल्यामुळे अनेक जण दिवसभर मोबाईलमध्ये गुंतून असतात. त्यातून आॅनलाईन सर्चिंग वाढली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या पद्धतींनी गंडवण्याचा सपाटा लावला आहे. नागपुरात दर दिवशी सायबर शाखेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. १ जानेवारी ते १५ जुलै २०२० पर्यंत सायबर शाखेकडे २,२७५ तक्रारी आल्या असून त्यातील सर्वाधिक तक्रारी फसवणुकीच्या आहेत. केवायसी अपडेट, आॅनलाईन शॉपिंग, एटीएम क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे, कार्ड क्लोनिंग, ओटीपी शेअरिंग, आॅनलाईन फंड ट्रान्सफर असे हे फसवणुकीचे नवनवे प्रकार आहेत; त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर करणे, त्रास देणे, धमक्या देणे, अश्लील शिवीगाळ करणे, विनयभंग करणे, अश्लील फोटो पाठविणे, असेही गुन्हे घडत आहेत. सायबर शाखेत दाखल झालेल्या तक्रारींपैकी ११२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून २९ गुन्हे दाखल झाले आहेत. २७ आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
----
गुन्हे आणि तक्रारीची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.

फसवणूक : १,९१६
फेसबुक फोटो, न्यूड फोटो, अश्लील चित्रफीत, प्रोफाईलचा गैरवापर, विनयभंग : २९७
हॅकिंग : ४७
फोन, सोशल मीडियावरून
धमकी देणे : १५
-------
नागपुरातील डॉक्टरची अमेरिकेत फेक ई-मेल आयडी
नागपुरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि ‘कोम्हाड’ या आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे पदाधिकारी असलेले डॉ. उदय बोधनकर यांच्या नावे गेल्या आठवड्यात सायबर गुन्हेगारांनी अमेरिकेत बनावट ई-मेल आयडी तयार केली. त्यावरून चुकीचे मेल पाठवून अमेरिका, फिलिपिन्स, आॅस्ट्रेलियासह विविध देशांतील डॉक्टरांना आर्थिक गंडा घातला. हे हाय प्रोफाईल प्रकरण सध्या वैद्यकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
----

 

Web Title: The number of corona patients in Vidarbha is close to 10,000, the death toll is 269

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.