जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या पन्नाशीच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST2021-09-02T04:18:03+5:302021-09-02T04:18:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून, सक्रिय रुग्णांची संख्या अनेक महिन्यानंतर प्रथमच ५० च्या ...

The number of active patients in the district is within fifty | जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या पन्नाशीच्या आत

जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या पन्नाशीच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून, सक्रिय रुग्णांची संख्या अनेक महिन्यानंतर प्रथमच ५० च्या खाली गेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ४५ सक्रिय रुग्ण असून, ग्रामीण भागात चारच जणांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारच्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात सहा नवे बाधित रुग्ण आढळले.

नागपूर जिल्ह्यात बुधवारी ४ हजार ७१० चाचण्या झाल्या. यातून ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील ५ रुग्ण शहरातील असून, एक ग्रामीणमधील आहे. जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ९३ हजार ३६ इतकी झाली आहे. त्यात शहरातील ३ लाख ४० हजार ९० तर ग्रामीणमधील १ लाख ४६ हजार १२८ जणांचा समावेश आहे, तर मृत्यूसंख्या १० हजार ११९ वर पोहोचली आहे.

बुधवारी जिल्ह्यातील २७ जण बरे झाले. त्यात शहरातील २५ जण होते.

- कोरोनाची बुधवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४,७१०

शहर : ५ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९३,०३६

एकूण सक्रिय रुग्ण : ४५

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,८७२

एकूण मृत्यू : १०,११९

Web Title: The number of active patients in the district is within fifty