हुडकेश्वर पिपळा रोडवर डिझल चोरांचा उपद्रव, स्थानिकांनी केली 'ही' मागणी

By मंगेश व्यवहारे | Updated: November 18, 2023 14:35 IST2023-11-18T14:35:25+5:302023-11-18T14:35:55+5:30

डिझेल चोर चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद

Nuisance of diesel thieves on Hudakeshwar Pipla Road | हुडकेश्वर पिपळा रोडवर डिझल चोरांचा उपद्रव, स्थानिकांनी केली 'ही' मागणी

हुडकेश्वर पिपळा रोडवर डिझल चोरांचा उपद्रव, स्थानिकांनी केली 'ही' मागणी

नागपूर : हुडकेश्वर पिपळा रोडवर रात्रीला डिझेल पेट्रोल चोरांचा उपद्रव वाढला आहे. या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेडर्स वाल्यांच्या ट्रकांचे डिझेल व लोकांच्या घरापुढे उभ्या असलेल्या वाहनांचे पेट्रोल चोरी गेल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डिझेल चोरांकडून चोरी केली जात असताना सीसीटीव्हीमध्ये ते कैदही झाले आहे.

सीसीटीव्हीतील छायाचित्रानुसार दोन युवक दुचाकीवर येऊन ट्रकच्या डिझेलची टाकी फोडून चोरी करतांना दिसत आहे. या चोरट्यांनी डिझेलची चोरी केल्यानंतर हुडकेश्वर परिसरातून दुचाकीने जात असल्याचेही वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून ह्या घटनांची संख्या वाढली आहे.  स्थानिक लोकांनी यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याला सूचनाही दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे. या मार्गावर नियमित पेट्रोलिंग व्हावी, अशी मागणी स्थानिकांची आहे.

Web Title: Nuisance of diesel thieves on Hudakeshwar Pipla Road