शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता संयम संपला

By admin | Updated: November 13, 2016 02:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली.

बँकांपुढे रांगाच रांगाएटीएममध्ये ठणठणाट नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली. संपूर्ण देशाने या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. नवीन नोटा मिळण्यास एक दोन दिवस अडचण होईल, ही अपेक्षा धरून नागरिकांनी दोन नव्हे तर तीन दिवस त्रास सहन केला. परंतु चार दिवस उलटूनही बँकांमधील नागरिकांच्या रांगा कायम आहे. बहुतांश एटीएम बंद आहेत. काही एटीएम सुरू होतात तर तासाभरात पैसे संपतात. नागरिकांजवळ खर्च करायला रुपये नाहीत. साध्या चहाच्या दुधासाठी सुटे पैसे शिल्लक राहिले नाही, अशी अवस्था झाली आहे. आपली कामे सोडून लोक बँकेत रांगा लावत आहेत. सकाळी आलेल्या व्यक्तीचा सायंकाळी नंबर लागूनही नवीन रुपये मिळतीलच याची शाश्वती नाही. एकूणच परिस्थिती हाताळण्यास व्यवस्था अपयशी ठरली आहे. त्याचा फटका मात्र सामान्य व्यक्तीला बसला आहे. त्यामुळे आता गरीब असो की मध्यमवर्गीय, नागरिकांची सहनशीलता संपत असून त्यांच्या मनातील संताप आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. शहरात चौथ्या दिवशी सुद्धा बँकांपुढे नागरिकांच्या रांगा होत्या. १० वाजता बँक उघडत असेल तर लोक सकाळी ८ ते ९ वाजेपासूनच बँकापुढे रांगा लावून उभे होते. शहरातील सर्वच भागातील बँकांमध्ये नागरिकांचा रांगा होत्या. जवळपास ४ ते ४.३० वाजता रुपये संपल्याचे कारण सांगून बँकेचे गेट बंद करण्यात आले. त्यामुळे रांगेत असलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती माघारी जावे लागले. सीताबर्डी येथे बँकेत शाखेत सकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. दोन दोन तासानंतर लोकांचा नंबर लागत होता. पैसे भरणे आणि काढण्याचे दोन काऊंटर उघडण्यात आले होते तर एक काऊंटर चलन बदलवण्यासाठी होते. तरीही एखादे काऊंटर आणखी सुरू करावे, अशी नागरिकांची अपेक्ष होती. बहुतांश बँकेत सारखीच स्थिती होती. जिल्हाधिकारी घेणार अधिकाऱ्यांची बैठक ५०० व १००० रुपयाच्या नोटा १४ नोव्हेंबरपर्यंत चालतील, असे शासनाने जाहीर केले आहे. तसेच वारंवार निर्देश जारी केल्यानंतरही रुग्णालये, पेट्रोल पंप आणि काही शासकीय संस्थांमध्ये ५०० व १००० रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीला जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले असून यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. नागरिकांना होत असलेल्या या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे बँक अधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यांना नागरिकांना येत असलेल्या अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकेत काऊंटर वाढविणे आदीसंदर्भातही सूचना केल्या जातील. बँकेत पुरेशा नोटा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचण येत आहेत. आम्ही रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात आहोत. रिझर्व्ह बँकेतर्फे लवकरच हेल्पलाईन सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.