शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘फास्ट फूड’वर नजर

By admin | Updated: June 16, 2015 02:42 IST

‘मॅगी’मध्ये घातक रासायनिक घटक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संवेदनशील असलेल्या ‘फास्ट अ‍ॅण्ड

केंद्राने राज्याकडे सोपविली २५ उत्पादनांची यादी नागपूर : ‘मॅगी’मध्ये घातक रासायनिक घटक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संवेदनशील असलेल्या ‘फास्ट अ‍ॅण्ड जंक फूड’ उत्पादनाची एक यादी तयार केली आहे, ज्यात आरोग्यासाठी घातक असलेले तत्त्व आढळून येऊ शकते. अशा २० ते २५ उत्पादनांची एक यादी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपविली आहे. या खाद्यपदार्थांची तपासणी सुरू करण्यात आली असून प्रयोगशाळांचा अहवाल आल्यानंतरच या खाद्यपदार्र्थांची नावे जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. रेशन दुकानांशी संबंधित तक्रारींवर सुनावणी करण्यासाठी ते सोमवारी नागपुरात आले यावेळी पत्रकारांशी बोलत होते. बापट यांनी सांगितले की, पुणे येथील अन्न व औषधी प्रशासन विभागातर्फे संबंधित उत्पादनांचे काही नमुने तपासले जात आहेत. ही प्रक्रिया खूप लांबलचक असते. त्यामुळे यात काही वेळ लागू शकतो. या तपासणीमध्ये उपरोक्त यादीतील खाद्यपदार्थ दूषित आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध निश्चित कारवाई केली जाईल. ‘मॅगी’ प्रकरणात बॅचच्या आधारावर नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली. राज्यभरातून मॅगीचे नमुने एकत्र करून त्यांची तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेत करण्यात आली. प्रक्रिया लंबलचक असल्यामुळे अहवाल यायला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने ज्या कंपन्यांची यादी राज्य सरकारकडे सोपविली ती उत्पादने आणि त्यांच्या कंपन्यांची नावे कोणती? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. परंतु बापट यांनी कंपन्यांची नावे जाहीर केली नाही. केवळ ती उत्पादने फास्ट फूडशी संबंधित असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)