शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांना नोटीस

By admin | Updated: April 7, 2017 02:57 IST

आशीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना काँग्रेसचे शहर अध्यक्ष ...

शहर अध्यक्षांनी मागविले स्पष्टीकरण : शिस्तभंग कारवाई होणारनागपूर : आशीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपण कुणाच्या आदेशावरून भाजपाला मतदान केले, याचे स्पष्टीकरण सात दिवसात सादर करण्याच्या सूचना देत अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.आशीनगर झोनमध्ये बसपाचे सात, काँग्रेसचे सहा व भाजपाचे तीन नगरसेवक आहेत. झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनोज सांगोळे, भावना लोणारे, दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर या पाच नगरसेवकांनी भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे यांना मतदान केले होते. तर नगरसेवक संदीप सहारे मतदानाला अनुपस्थित राहिले होते. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतरही काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट भाजपाला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संबंधित नगरसेवकांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. शहर काँग्रेसकडून नगरसेवकांना अभय असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्तानंंतर शहर काँग्रेसने संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणुकीत घडलेल्या प्रकाराबद्दल शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभापतिपदासाठी थेट भाजपाला मतदान केल्यामुळे काँग्रेसवर ताशेरे ओढल्या गेले. याची गंभीर दखल घेत शहर अध्यक्ष ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या अहवालाची वाट न पाहता थेट संबंधित नगरसेवकांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, झोन सभापतीच्या निवडणुकीत कुठलीही सूचना नसताना आपण भाजपाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. यासाठी आपल्याला कुणी निर्देश दिले होते, कुणी असा असा निरोप दिला होता का? काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी असे भाजपाला मतदान करणे शिस्तभंगात मोडते. तरी आपण आपले म्हणणे सात दिवसात कळवावे. अन्यथा आपल्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिस्तपालन समितीकडे पाठविला जाईल. शहर अध्यक्षांच्या या नोटीसमुळे आता संबंधित नगरसेवकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. झोन सभापतीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे अनुपस्थित होते. सहारे यांनाही महत्त्वाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहण्याचे कारण पक्षाला द्यावे लागणार आहे.(प्रतिनिधी)