शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनओबीडब्ल्यू’ आव्हान स्वीकारण्यास तयार

By admin | Updated: April 25, 2016 02:54 IST

बँकांचे विलीनीकरण, एकत्रीकरण, खासगीकरण, वाढते अनुत्पादन कर्ज खाते, कंत्राटी पद्धतीचा भडीमार,

रामनाथ किणी यांचे प्रतिपादन : १० मे रोजी संसदेपुढे आंदोलननागपूर : बँकांचे विलीनीकरण, एकत्रीकरण, खासगीकरण, वाढते अनुत्पादन कर्ज खाते, कंत्राटी पद्धतीचा भडीमार, अपुरी कर्मचारी संख्या, उद्योगाची हळुवार वाढ, कर्मचाऱ्यांवर अनेकांगी जबाबदाऱ्या आदी आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय बँक कर्मचारी फेडरेशन (एनओबीडब्ल्यू) तयार असल्याचे उद्गार एनओबीडब्ल्यूचे अखिल भारतीय अध्यक्ष रामनाथ किणी यांनी येथे काढले. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त एनओबीडब्ल्यूच्या काँग्रेसनगर येथील केंद्रीय कार्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भामसंचे विदर्भ प्रदेशचे महामंत्री अशोक भुताड होते. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारकिणी म्हणाले, फेडरेशन स्थापनेपासूनच अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे. यापुढेदेखील समाज, बँकिंग उद्योग व कर्मचारी यांच्यावरील संकटाचा मुकाबला करण्यात येणार आहे. विकसित देशांच्या प्रभावाखाली भारतात विघातक शर्ती लागू करणाऱ्या डंकेल प्रस्तावाला विरोध करण्यासाठी संघटनेने भारतीय मजदूर संघाच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी आंदोलन केले होते. १९८६ मध्ये भारतीय बँकिंग उद्योगात बदल सुचविणाऱ्या नरसिम्हन समितीच्या अयोग्य शिफारशींविरुद्ध फेडरेशनने केलेल्या आंदोलनामुळे शासनास माघार घ्यावी लागली होती. त्याचप्रमाणे बँकिग सुधारणा व खंडेलवाल समितीविरुद्धही आवाज उठविला होता. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी फेडरेशन कार्यरत असल्याचे किणी यांनी स्पष्ट केले. बँकांच्या खासगीकरणाला विरोधकिणी म्हणाले, १९६७ च्या पहिल्या वेतन करारापासून नुकत्याच झालेल्या दहाव्या द्विपक्ष करारापर्यंत केलेला संघर्ष हे एक उत्तम उदाहरण आहे. केवळ फेडरेशनच्या पाठपुराव्यामुळे अंदाधुंद संगणीकरणाचा वेग थोपविला गेला. बँक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा दुसरा विकल्प मिळाला. १५ टक्के पगारवाढ मिळाली. सध्याच्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता संघटना प्रयत्नशील असून प्रश्न लवकरच सुटेल, अशी चिन्हे आहेत. भरती, थकित कर्जदारांवर कारवाई, खासगीकरणाला विरोध, महिला कर्मचाऱ्यांना सुविधा आदी मागण्यांसाठी १० मे रोजी संसदेसमोर धरणे कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विदर्भ बँक कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत खानझोडे, महामंत्री प्रकाश सोवनी, कार्यालय सचिव राजीव पांडे यांच्यासह अर्चना सोवनी, विनायक जोशी, अरविंद भुमराळकर, श्याम हुद्दार, नितीन बोरवणकर, सुरेश चौधरी, महेंद्र भिसीकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)