शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

"निधी नाही" हे कारण मान्य नाही! पोलिस भरतीबाबत कोर्टाची सरकारला ताशेरेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:21 IST

८३८ पोलिस पदे रिक्त, ३ हजारांवर नवीन पदांची मागणी : नागपूर पोलिस दलाचा गंभीर विषय न्यायालयात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर व जिल्हा पोलिस विभागाला आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन महिन्यांमध्ये धोरणात्मक निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. तसेच, समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, याकडे लक्ष वेधून निधीच्या कमतरतेमुळे पोलिसांची भरती करणे शक्य नसल्याचे कारण ऐकून घेतले जाणार नाही, असे बजावले.

यासंदर्भात न्यायालयात जनहित त्यावर याचिका प्रलंबित आहे. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य सरकारने पोलिस पदे मंजुरीसंदर्भात २५ ऑगस्ट २०२३ रोजी निर्णय जारी केला आहे. तो निर्णय केवळ नवीन पोलिस ठाण्यांना लागू आहे, असे गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अनुपकुमार सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयाने जुना-नवीन असा भेदभाव करता येणार नाही. या निर्णयाची सर्वच पोलिस ठाण्यांसाठी समान पद्धतीने अंमलबजावणी करावी लागेल, असे न्यायालयाने सांगितले. राज्यामध्ये सर्वत्र गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांना बंदोबस्ताची जबाबदारीही सांभाळावी लागत आहे. या परिस्थितीत पोलिस विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ असणे गरजेचे आहे, असेदेखील न्यायालय म्हणाले. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

८३८ पदे रिक्तनागपूर शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत ४४७ व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत ३९१, अशी एकूण ८३८ पदे रिक्त आहेत. याशिवाय, पोलिस आयुक्तांनी सहायक उपनिरीक्षकाच्या ६, पोलिस हेड कॉन्स्टेबलच्या ४२, पोलिस कॉन्स्टेबलच्या २०७ व पोलिस अंमलदाराच्या १३६ तर, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस निरीक्षकाच्या १६, सहायक पोलिस निरीक्षकाच्या ३७, पोलिस उप-निरीक्षकाच्या १५८, सहायक पोलिस उप-निरीक्षकाच्या २४६, पोलिस हवालदाराच्या ६९१ व पोलिस शिपायाच्या एक हजार ३९ नवीन पदांची मागणी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस