शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मनपा अर्थसंकल्पात पडणार घोषणांचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:05 AM

अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित विशेष सभेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे आपला अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात पूर्व नागपूरला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या करवाढीची शक्यता दिसत नाही.

ठळक मुद्देवर्ष २०१९-२० चा अर्थसंकल्प : स्थायी समिती आज सभागृहात सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेच्या स्थायी समितीच्या वर्ष २०१९-२० च्या प्रस्तावित अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊ स पडण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बुधवारी सकाळी ११ वाजता महाल येथील टाऊ न हॉल येथे आयोजित विशेष सभेत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे आपला अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात पूर्व नागपूरला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या करवाढीची शक्यता दिसत नाही.अर्थसंकल्पात सुमारे १५० कोटींचे जुने बिल व विकास कामासाठी तरतूद केली जाणार आहे. तसेच कंत्राटदारांचे जानेवारी ते मार्च दरम्यानचे थकीत बिल देण्यासाठी व नवीन योजनांसाठी तरतूद करण्यासाठी दबाव राहणार आहे. गेल्यावर्षी वीरेंद्र कुकरेजा यांनी २९४६ कोटींचे बजेट सादर केले होते. परंतु प्रत्यक्ष उत्पन्न २०१७.७५ कोटी होते. यामुळे अपेक्षित व प्रत्यक्ष उत्पन्न यात ९२८.२५ कोटींची तफावत होती. याचा विचार करता आयुक्त अभिजित बांगर यांनी अर्थसंकल्पात ४० टक्के कपात केली होती. परिणामी अनेक योजनांची अंमलबजावणी करता आलेली नाही. पुढील वर्षाचा अर्थसंकल्प ३२०० कोटींचा राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षातील उत्पन्नाचा विचार करता प्रयत्न करूनही पुढील वर्षात उत्पन्नाचा आकडा २५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांना आश्वासनाची खैरात मिळणार असली तरी निधीची उपलब्धता विचारात घेता घोषणा प्रत्यक्ष अमलात येण्याची शक्यता दिसत नाही.अनुदानातून ७६ टक्के उत्पन्नअर्थसंकल्पातील आकड्यांचा विचार करता महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ७६ टक्के वाटा हा सरकारी अनुदानाचा आहे. तर कर व अन्य स्रोतातून महसूल आला आहे. २०१७.७५ कोटीत महापालिकेला राज्य सरकारकडून विविध अनुदान स्वरूपात १५४४.२२ कोटी प्राप्त झाले. यात ८६९.०७ कोटी जीएसटी अनुदानाचे आहे.मालमत्ताकराचे उद्दिष्ट मोठेमहापालिकेला दर महिन्याला ९३ कोटी जीएसटी अनुदान मिळत आहे. त्याशिवाय पुढील वर्षात मालमत्ता कर वसुलीचे मोठे उद्दिष्ट राहू शकते. गेल्या वर्षात मालमत्ताकरातून २२८ कोटी प्राप्त झाले. तर उद्दिष्ट ५०९ कोटींचे होते. वित्त वर्षात पाणीपट्टी, नगररचना व बाजार विभागाच्या उत्पन्नात चांगली वाढ अपेक्षित आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019