शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींचा आज षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा

By admin | Updated: May 27, 2017 02:34 IST

भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

अमित शहा, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, श्री श्री रविशंकर येणार मुख्यमंत्री सिंह, चौहान, फडणवीस यांचीही उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने शनिवारी, कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी ५.३० वाजता गडकरी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राहतील. आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह देशभरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील आमदार, खासदार व विविध क्षेत्रातील मान्यवर गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतील. प्रसिद्ध गायक सुदेश भोसले व वैशाली सावंत यांच्या सुमधूर मराठी-हिंदी गीतांनी या समारंभाची सुरुवात होईल. या सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समितीचे संयोजक असून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत. हायटेक सोहळा कस्तूरचंद पार्क सजले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त कस्तूरचंद पार्क येथे होणारा सोहळा हा पूर्णपणे हायटेक राहणार आहे. सत्कारासाठी उभारण्यात आलेले मुख्य व्यासपीठ हे अतिशय भव्य असून अत्याधुनिक आहे. स्टेजवरील साऊंड व लाईट व्यवस्था प्रगत आहे. पाहुण्यांच्या मागे एक भव्य स्क्रीन उभारण्यात आला आहे. नागपुरातील तापमान पाहता पाहुण्यांसह सर्वांसाठीच कूलरची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. व्हीआयपींना वेटिंगसाठी स्टेजच्या मागच्या बाजूला अनेक डोम उभारण्यात आलेले आहेत. जवळपास ३० हजार लोकांसाठी कस्तुरचंद पार्कवर व्यवस्था करण्यात आली आहे. किमान ५ हजार व्हीआयपी, व्हीव्हीआयपीसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवर बसलेल्या कार्यकर्त्यांनाही स्टेजवरील प्रत्येक घडामोड अनुभवता यावी, पाहता यावी यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या उपस्थित राहणाऱ्यांसाठी ५ प्रवेशद्वार करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते नेमण्यात आले आहे. कुणालाही सहज प्रवेश करता येणार नाही, या दृष्टीकोनातून संपूर्ण कस्तुरचंद पार्कला कुंपन तयार करण्यात आले आहे. हार, पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणू नका भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, परंतु या कार्यक्रमासाठी येताना सोबत हार, फुले, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ आणू नये. केवळ गडकरींना मनापासून शब्दाने शुभेच्छा देऊन त्यांचे अभीष्टचिंतन करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदारांनी केले आहे. वाहनांना ‘नो एन्ट्री’ कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कस्तूरचंद पार्क परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांनी त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. शनिवार २७ मे रोजी कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश कायम राहतील. या आदेशानुसार लिबर्टी चौक ते एलआयसी चौक, पाटणी आॅटोमोबाईल चौक ते एलआयसी चौक, कन्नमवार पुतळा चौक ते संविधान (आरबीआय) चौक, फॉरेस्ट आॅफिस चौक ते संविधान चौक, झीरो माईल ते संविधान चौक, जयस्तंभ चौकाकडून श्री मोहिनी कॉम्प्लेक्स चौक या रस्त्याने सायकल रिक्षासह सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. त्यांची वाहने ही वेगवेगळ्या मार्गांनी वळविण्यात येतील. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत बंदी कायम राहील. अष्टपैलू व्यक्तित्त्वाचे धनी नितीन गडकरी माणूस जपणारे, माणुसकीचा ओलावा शाबूत ठेवणारे, स्पष्ट वक्ते, कणखर स्वभावाचे, सतत विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे, राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे, राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे नेते म्हणजे नितीन गडकरी होत. खऱ्या अर्थाने ज्यांना अष्टपैलू व्यक्तित्त्वाचे धनी म्हणता येईल असे नेते म्हणजे नितीन गडकरी. माझे आणि त्यांचे गेली २५ वर्षे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वेगवेगळ्या पक्षात काम करीत असतानाही आमच्या मैत्रीसंबंधांवर त्याचा परिणाम आजपावेतो झाला नाही. कारण मी जसा वैयक्तिक संबंध जपणारा आहे तसेच गडकरीसुद्धा राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे आहेत.एका परिपक्व नेत्यात जे गुण पाहिजे ते सर्व गुण गडकरींच्या अंगी आहेत म्हणून मी त्यांना नेता मानतो. गडकरी साहेबांच्या नेतृत्वाविषयी काही सांगण्याची आज गरज उरलेली नाही. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ते सिद्ध करून