शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

गडकरी की ठाकरे... विकासकामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी?;

By योगेश पांडे | Updated: April 9, 2024 10:03 IST

गडकरी विरुद्ध ठाकरे थेट लढत, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची एकजूट

योगेश पांडेनागपूर : हायप्रोफाईल नागपूरलोकसभा मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात असले तरी केंद्रीय मंत्री व भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत दिसून येत आहे. गडकरी यांनी यावेळी पाच लाख मतांनी निवडून येऊ, असा दावा केला असून विकास ठाकरे यांच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसचे पदाधिकारी प्रचाराला भिडल्याचे चित्र आहे.

संघभूमी व दीक्षाभूमीचा मतदारसंघ अशी नागपूरची ओळख आहे. या मतदारसंघावर २०१४ पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. विलास मुत्तेमवार यांनी येथून हॅटट्रिकदेखील साधली होती. नंतर २०१४ व २०१९ मध्ये नितीन गडकरी यांनी येथून विजय मिळविला. नागपुरात जातीय समीकरणांची विविधता आहे. कुणबी, तेली, हलबा, अनुसूचित जाती, हिंदी भाषिक, मुस्लीम प्रभाव असलेले पट्टे आहेत. २०२४ च्या निवडणुकीची भाजपने अगोदरपासूनच तयारी सुरू केली. बूथप्रमुख मोहिमेच्या माध्यमातून सातत्याने गृहसंपर्क सुरू होता. याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. तळागाळात प्रचारावर भाजपकडून भर देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस संघटनेत मधल्या काळात शिथिलता आली होती. मात्र निवडणूक जाहीर होताच उत्साह निर्माण झाला आहे. गटातटाचे राजकारण विसरून काँग्रेस नेते ठाकरे यांच्या प्रचारासाठी एकत्रित आले आहेत. विकास ठाकरे यांची स्वत:ची वेगळी व्होटबँक असून नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

अल्पसंख्याक, अनुसूचित जातीच्या मतांवर भरभाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांची पारंपरिक व्होटबँक आहेच. मागील काही निवडणुकांमध्ये बसपा, एआयएमएआयएम या पक्षांकडे अनुसूचित जाती व मुस्लिमांची मते गेली होती. यंदा ही मते आपल्याकडे वळावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच गडकरींचे कुटुंबीय अल्पसंख्याक वस्तीमध्ये जाऊन संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून मध्य व उत्तर नागपुरात जोर लावण्यात येत आहेत. याशिवाय ओबीसी मतांवरदेखील बरेच काही अवलंबून आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

भाजपकडून मागील १० वर्षांत या मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांच्या नावावर मते मागण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी तर गडकरी यांच्या नावानेच प्रचार सुरू आहे. ‘स्मार्ट सिटी’ असली तरी शहरात अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. अगदी पॉश भागांनादेखील पुराचा मोठा फटका बसला होता. काँग्रेसकडून या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे.नागपुरात विकासकामे झाली तरी मोठ्या कंपन्या, उद्योग व रोजगारनिर्मिती हे मुद्दे काँग्रेसकडून उचलण्यात येत आहेत. भाजपकडून आकडेवारी सादर करत या सर्व गोष्टी झाल्या असल्याचा दावा केला जात आहे.

२०१९ मध्ये काय घडले?नितीन गडकरी     भाजप (विजयी)    ६,६०,२२१नाना पटोले    काँग्रेस    ४,४४,२१२मोहम्मद जमाल    (बसपा)    ३१,७२५नोटा    -    ४,५३८

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती

विजयी उमेदवार    पक्ष (मतदारसंघ)        टक्केदेवेंद्र फडणवीस     भाजप (दक्षिण-पश्चिम नागपूर)         ५६.८६ %मोहन मते         भाजप (दक्षिण नागपूर)          ४३.६२ %कृष्णा खोपडे     भाजप (पूर्व नागपूर)         ५२.३५ %विकास कुंभारे     भाजप (मध्य नागपूर)             ४६.३७ %विकास ठाकरे     कॉंग्रेस (पश्चिम नागपूर)         ४५,६५ %नितीन राऊत     काँग्रेस (उत्तर नागपूर)         ४४.३५ %

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४     नितीन गडकरी     भाजप     ५,८७,७६७     ५४.१३ %२००९     विलास मुत्तेमवार     काँग्रेस     ३,१५,१४८     ४१.७२ %२००४      विलास मुत्तेमवार     काँग्रेस     ३,७३,७९६     ४७.१७ %१९९९     विलास मुत्तेमवार      काँग्रेस     ४,२४,४५०     ५२.३८ %१९९८    विलास मुत्तेमवार      काँग्रेस     ४,८६,९२८     ५७.४१ %

गेल्यावेळी विधानसभा मतदारसंघात कुणाचा होता जोर ?नितीन गडकरी - भाजप nदक्षिण-पश्चिम नागपूर १,२०,१८५ nदक्षिण नागपूर१,१४,९४५nपूर्व नागपूर) १,३५,४५१nपश्चिम नागपूर१,०२,९१६nमध्य नागपूर ९६,३४६नाना पटोले - कॉंग्रेस nउत्तर नागपूर९६,६९१ 

 

टॅग्स :nagpurनागपूरlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरी