शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

निर्मला सीतारामन यांचा व्यापारी, उद्योजकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:00 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड १९ चे पाचवे पॅकेज रविवारी जाहीर करून त्यात व्यापारी, उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देशेवटी सर्व जबाबदारी केंद्राचीच

सोपान पांढरीपांडेनागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड १९ चे पाचवे पॅकेज रविवारी जाहीर करून त्यात व्यापारी, उद्योजकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.रविवारी ज्या सात क्षेत्रांसाठी सीतारामन यांनी सुधारणा, सवलती घोषित केल्या. त्यात मनरेगा, आरोग्य सेवा व शिक्षण, व्यापार, कंपनी कायद्याचे सुसुत्रीकरण, नादारी व दिवाळखोरी कायदा, सार्वजनिक उपक्रम व राज्य सरकारे यांचा समावेश होता. आजच्या सुधारणांचा मुख्य भर व्यापार, कंपनी कायदा, नादार व दिवाळखोरी कायदा यावरच होता. यातील मुख्य सवलती अशा आहेत. यापुर्वी एक लाख कर्जाचे हफ्ते विलंबाने भरले तर तो ‘डिफॉल्ट’ (कर्ज चुकवणे) मानल्या जात असे. आता ही मर्यादा एक कोटीपर्यंत वाढविली आहे. त्यानंतर नादारी व दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई धनको बँका करु शकतील. याच बरोबर कोविड १९ साठी काढलेले कर्ज वेळेत भरले नाही तरीही ‘डिफॉल्ट’ मानला जाणार नाही. लहान व्यापाऱ्यांना या सवलतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कंपनी कायद्यांतर्गत छोट्या त्रुटी कंपनी व अधिकारी मिळुन समजुन घेतील व तो कायदेभंग मानला जाणार नाही. याच बरोबर आता ५८ प्रकारचे उल्लंघन कारवाई योग्य मानले जाणार नाही. पुर्वी ही संख्या फक्त १८ होती. याच बरोबर कंपनी कायद्यात सुधारणा करुन तो अधिक उद्योजकप्रेमी केला जाईल. या सर्व सुधारणांचा मोठ्या कंपन्यांना व मध्यम उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या कंपन्यांना आता त्यांचे समभाग विदेशी बाजारात नोंदवता येतील. तर एखाद्या कंपनीने तिचे अपरिवर्तनीय कर्ज रोखे शेअर बाजारात नोंदवले तरी ती कंपनी सुचीबद्ध (लिस्टेड) समजली जाणार नाही याचा फायदाही मध्यम उद्योगांना होणार आहे. आजच्या सवलतींमध्ये मनरेगाचे अनुदान ६१ हजार कोटींवरून १०१००० कोटीपर्यंत वाढवले आहे. त्यातून घरी परतलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार देण्याची योजना आहे. यामुळे शहरात कुशल मजुरांचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे. सीतारामन यांनी आज पहिली ते बारावी प्रत्येक वर्गासाठी वेगळे आॅनलाईन चॅनल, प्रत्येक जिल्ह्यात कोविड १९ दवाखाना देण्याचीही घोषणा केली आहे. राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडुन कर्ज उभारण्याची मर्यादा त्यांच्या जीडीपीच्या ३ टक्केवरून ५ टक्के वाढविली आहे. पण त्यापैकी फक्त ३.५० टक्के सहज मिळणार आहेत व उरलेल्या १.५० टक्क्यांसाठी अनेक अटींची पुर्तता करावी लागणार आहे. काही राज्ये विरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत. त्यांची अडवणुक करण्याचा हा प्रयत्न दिसतो. कोविड १९ हे अभुतपुर्व संकट आहे. अशा वेळी केंद्र सरकारने राजकारण करणे अयोग्य आहे. कारण भारत सार्वभौम राष्ट्र असल्याने शेवटी सर्व जबाबदारी केंद्राचीच राहणार आहे.२० लाख कोटींचे कोविड १९ पॅकेज (रु कोटी)१ कोविडपुर्वीच्या सवलती १,९२,८००२ सवलत पॅकेज १ ५, ९४, ५५०३ सवलत पॅकेज २ ३, १०, ०००४ सवलत पॅकेज ३ १, ५०, ०००५ सवलत पॅकेज ४ व ५ , ४८, १००६ रिझर्व्ह बँकेच्या तरलता योजना १२, ९५, ४५०८,०१, ६०३..............................................................२०, ९७,०५३ 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन