शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आरपीएसएफच्या जवानासह नऊ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:58 PM

श्रमिक रेल्वे गाडीमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएसएफचा जवान कोविड पॉझिटिव्ह आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. अजनी क्वॉर्टरमध्ये हा कर्मचारी राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, काही रेल्वे कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. भगवाननगर येथील बँक कॉलनी येथेही एका रुग्णाचे कोविड निदान झाले. रेल्वे क्वॉर्टर व बँक कॉलनीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला. या दोन रुग्णासह नागपुरात नऊ नव्या रुग्णांची नोंंद झाली. रुग्णांची संख्या ४५५ झाली.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या ४५५ : अजनी रेल्वे क्वॉर्टर, बँक कॉलनीमध्ये कोरोनाचा शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  श्रमिक रेल्वे गाडीमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएसएफचा जवान कोविड पॉझिटिव्ह आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. अजनी क्वॉर्टरमध्ये हा कर्मचारी राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, काही रेल्वे कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. भगवाननगर येथील बँक कॉलनी येथेही एका रुग्णाचे कोविड निदान झाले. रेल्वे क्वॉर्टर व बँक कॉलनीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला. या दोन रुग्णासह नागपुरात नऊ नव्या रुग्णांची नोंंद झाली. रुग्णांची संख्या ४५५ झाली. आज पुन्हा सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.श्रमिक रेल्वे गाडीमधूनच संबंधित जवानाला लागण झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. २८ वर्षीय जवानाला लक्षणे दिसून आल्याने दोन दिवसापूर्वी मेयो रुग्णालयात संशयित म्हणून भरती झाला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या जवानासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. १६ वर लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे. ओंकारनगर हावरापेठ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या भगवाननगर बँक कॉलनी येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा नमुना एम्सच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला एम्समध्ये भरती करण्यात आले. एम्समध्ये आता आठ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सांगण्यात येते की, या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिरसपेठ, टिपू सुलतान चौक व मोमीनपुरातील रुग्ण पॉझिटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्या आलेल्या नमुन्यामध्ये सिरसपेठ वसाहतीतील एक, टिपू सुलतान चौक परिसरातील दोन तर मोमीनपुरा वसाहतीतील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. यात २१, २४, २७, ६०, ६४ वर्षीय पुरुष ४८, ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.सहा रुग्णांना डिस्चार्जमेयोमधून आज सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली. यात गोळीबार चौक येथील एक लहान मुलगा, दोन महिला व एक पुरुष आहे. टिमकी येथील एक पुरुष तर मोमीनपुरा येथील एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३६२ झाली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २४६दैनिक तपासणी नमुने ११२दैनिक निगेटिव्ह नमुने ११३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४५५नागपुरातील मृत्यू ०९डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३६२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २५७०क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७९६पीडित-४५५-दुरुस्त-३६२-मृत्यू-९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर