शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरी एमआयडीसीतून नऊ बालकामगारांची सुटका; नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 21:58 IST

वेठबिगारांप्रमाणे १२-१२ तास कामाला जुंपले...

नागपूर : जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या बालमजुरीविरोधात कारवाई केली. नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीतून पथकाने नऊ बालकामगारांची सुटका केली. त्यात चार मुलींचा समावेश होता. या प्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बालकामगारांकडून काम करवून घेणाऱ्या परिसरातील इतर कंपन्यांत खळबळ उडाली आहे.राष्ट्रीय गोंडवाना पक्षाचे अध्यक्ष राकेश भलावी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फॅक्टरीत धाड टाकली. तेथे अल्पवयीन मुले मोठ्या यंत्रांवर काम करताना आढळली. मुलांची राहण्याची परिस्थितीही अत्यंत वाईट आणि अस्वच्छ असल्याचे आढळून आले. शिवाय, धोकादायक रासायनिक वातावरणात काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतर राज्ये आणि जिल्ह्यांमधून मुलांना तिथे कामासाठी आणल्याची प्रकरणेही उघडकीस आली आहेत. धाडीदरम्यान गोंधळ उडाल्याने काही मुलांना छुप्या रस्त्याने बाहेर काढण्यात आले.कारखान्यात कामगार कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केले जात होते. कोणत्याही बालकामगाराकडे नियुक्तीपत्र नव्हते, कामाचे तास निश्चित नव्हते आणि धोकादायक परिस्थितीत काम करून त्यांच्या जीवाशीच खेळण्यात येत होते. या प्रकरणी नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीतील एचआर मॅनेजर शशी नायर, वैभव मेहता, ठेकेदार मनोज भगत, जुगल प्रधान यांच्याविरोधात बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम, १९८६-३ तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुटीबोरी पोलिसांच्या मदतीने करण्यात आली. सुटका केलेल्या मुलांना त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसारे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे, तक्रारदार राकेश भलावी, चाइल्डलाइनच्या प्रतिनिधी पूजा कांबळे आणि मेघा पाटील, रूपाली वानखेडे आणि अश्विनी चौरे यांच्यासह रुरल प्रॉब्लेम लिबरेशन ट्रस्टच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

१२ तास करवून घेत होते कामबालकामगारांकडून अक्षरश: वेठबिगाराप्रमाणे काम करवून घेतल्या जात होते. जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने बालकामगारांना विचारणा केली असता त्यांच्याकडून दिवसाचे १२ तास काम करवून घेतले जात होते. त्यांना १२ हजार ते १५ हजार पगार दिल्या जात होता.

बोगस आधार कार्डाच्या आधारे ठेवले कामावरकंपनीने कामगारांच्या भरतीसाठी ठेकेदारांना सांगितले होते. ठेकेदारांनी काही बालकामगारांचे बोगस आधार कार्ड बनविले होते. त्यात त्यांचे वय वाढविण्यात आले होते व नावदेखील बदलण्यात आले होते. त्यांच्या आधारे त्यांना कामावर ठेवण्यात आले होते. नऊ बालकामगार मध्यप्रदेश, ओडिसा, बिहार, छत्तीसगड येथील आहेत. त्यांच्या गरीब परिस्थितीचा फायदा उचलण्यात येत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Nine child laborers rescued from Butibori MIDC; Action on industry.

Web Summary : Nine child laborers, including four girls, were rescued from Narayana Enterprises in Butibori MIDC. They were working in hazardous conditions for long hours on fake IDs. Police filed a case against the HR manager and contractors.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMIDCएमआयडीसी