शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमलवार’चा अक्षय जाणार हवाई सफरीने नवी दिल्लीला

By admin | Updated: July 4, 2014 01:16 IST

हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असतं. पण योग येत नाही, तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळणं तसं नशीबच. पण, लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या

‘संस्काराचे मोती’ने दिली संधी : २५ लाख विद्यार्थ्यांतून निवडनागपूर : हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असतं. पण योग येत नाही, तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळणं तसं नशीबच. पण, लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमाने नागपुरातील सोमलवार हायस्कूल रामदासपेठमध्ये शिकणाऱ्या नववीच्या अक्षय विनायक एकनाथे या विद्यार्थ्याला विमानाने दिल्ली गाठण्याची ‘गुड न्यूज’ दिली आहे. येत्या १० जुलैला तो विमानाने दिल्ली गाठणार आहे. २०१३ वर्षात ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमावर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल २५ लाखावर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. जवळपास ३००० शाळांच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. नागपुरातील सर्वच शाळांच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याातून या स्पर्धेसाठी प्रत्येकी एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातून सोमलवार हायस्कूल रामदासपेठच्या अक्षय विनायक एकनाथे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. लोकमतच्या ‘संस्काराचे मोती’ उपक्रमातून अक्षयची एकमेव निवड झाल्याने त्याचा सोमलवार हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धात्मक परीक्षेच्या अनुषंगाने लोकमतमध्ये सुरू असलेला ‘संस्काराचे मोती’ हा उपक्रम प्रेरणादायी असून, चालू सत्रात लोकमतमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन सोमलवार हायस्कूलच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात मुख्याध्यापक व मान्यवरांनी केले. मुख्याध्यापिका सुवर्णा डायस, व्ही. पी. डाखोळे, एस. एस रॉय, एस. एस. खंगई, व्ही. व्ही. पाध्ये, एस. एस मंडपे या शिक्षिकांनी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)यंदाही सहभागी व्हा, हवाई सफरीला जा!लोकमतमध्ये सुरू असलेल्या ‘संस्काराचे मोती’तून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. हा उपक्रम अभ्यासासोबत सर्वव्यापी ज्ञानात भर घालणारा आहे. यावर्षी पर्यावरण विषयाला अनुसरून १ जुलै ते ११ आॅक्टोबर कालावधीत रोजच्या अंकात ‘ग्रीन किडस्’ विशेष पान प्रकाशित करण्यात येत आहे. त्यात शंभर कूपन प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला हवाई सफरीच्या संधीसह इतर बक्षिसांव्यतिरिक्त विशेष भेटवस्तू मिळणार आहेत. यंदाही २०१४ वर्षातील या उपक्रमात अधिकाधिक संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.