शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नीतू बर्वे झाल्या होत्या ‘वूमन आॅफ दि मॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 02:59 IST

तरुण वकील अ‍ॅड. नीतू बर्वे यांचा अपघाती मृत्यू नागपूरच्या वकीलजगताला धक्का देणारा ठरला. विधानभवन चौकात भरधाव वाहनाच्या धडकेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नागपूर : तरुण वकील अ‍ॅड. नीतू बर्वे यांचा अपघाती मृत्यू नागपूरच्या वकीलजगताला धक्का देणारा ठरला. विधानभवन चौकात भरधाव वाहनाच्या धडकेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अलीकडेच धडपड करणाऱ्या वकील म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायचा. युग चांडक खून खटल्याच्या सुनावणी काळात त्या दिवसभर प्रधान जिल्हा न्यायाधीश किशोर सोनावणे यांच्या न्यायालयात उपस्थित असायच्या. अ‍ॅड. राजेंद्र डागा हे या प्रकरणातील फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील होते. अर्थात सरकार पक्षाला सहाय्य, असा त्यांचा सहभाग होता आणि नीतू बर्वे या डागा यांच्या ‘ज्युनियर’ होत्या. राजेंद्र डागा यांचे वडील प्रसिद्ध विधिज्ञ हयात असताना नीतू बर्वे त्यांच्या कार्यालयात जात होत्या. २००९ पासून नीतू बर्वे या वकिली सेवेत होत्या. हल्ली त्या इन्शुरन्स पॅनलवरील वकील अ‍ॅड. डी. एन. कुकडे यांच्या कार्यालयात जायच्या. कौटुंबिक न्यायालय आणि चेक बाऊन्सची प्रकरणे त्या लढत होत्या. जिल्हा बार असोसिएशनने ‘जस्टिशिया’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यासाठी गत महिनाभरापासून वकिलांच्या विविध स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत नीतू बर्वे यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने त्या ‘वूमन आॅफ दि मॅच’ घोषित झाल्या होत्या.नीतू बर्वे या अत्यंत गरीब कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील मासोळी विकण्याचा छोटा व्यवसाय करतात. नीतू आणि त्यांच्या भगिनी कुटुंब सांभाळायच्या. अचानक भीषण अपघातात नीतू बर्वे यांचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सायंकाळी मोक्षधाम येथे नीतू बर्वे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष आसिफ कुरेशी यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या शोकसभेत डीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, डीबीएचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आदींनी श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)