जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:13 AM2018-01-06T00:13:33+5:302018-01-06T00:16:54+5:30

जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.

Need to amend land acquisition Act: Amar Habib | जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

जमीन अधिग्रहण कायद्यात सुधारणा करण्याची गरज : अमर हबीब

Next
ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलनाचे आजपासून दुसरे अधिवेशन

आॅनलाईन लोकमत
नागपूर : जमीन अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता त्यांची जमीन काढून एखाद्या व्यावसायिकाला दिली जाते. हा प्रकार एका व्यावसायिकाची जमीन दुसऱ्याला देण्यासारखे आहे. यामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली होते. हे योग्य नाही. त्यामुळे जमीन अधिग्रहण कायदा आणि कमाल जमीन धारण कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे मत किसानपुत्र आंदोलनचे नेते अमर हबीब यांनी आमदार निवास येथे व्यक्त केले.
जनमंच संस्थेच्या सहकार्याने किसानपुत्र आंदोलनचे द्वितीय अधिवेशन येत्या ६ व ७ जानेवारीला नागपूर येथील आमदार निवास येथे होणार आहे. हबीब यांनी या उपक्रमाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, कमाल जमीन धारण कायदा, अधिग्रहण कायदा आणि जमिनीसंदर्भातील इतर कायदे शेतकऱ्यांना घातक असून शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार आहेत. काँग्रेसने हे कायदे केले असून डाव्यांनी याला समर्थन दिले. तर आता भाजप याची अंमलबजावणी करीत आहे. कमाल जमीन कायद्यानुसार शेतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र सरकार जमीन संपादित करून उद्योगपती, संस्थांना देते. अशाप्रकारे सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन उद्योगपतींच्या घशात घातली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न भाववाढीपुरता मर्यादित ठेवला जातो. मात्र असे अनेक शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शरद पाटील, श्रीकांत दौंड, अमिताभ पावडे, संजय भरडे आदी उपस्थित होते.

अधिवेशनाचे उदघाटन  आज
जनमंचच्या सहकार्याने आयोजित किसानपुत्र आंदोलनाचे दुसऱ्या अधिवेशनाचे उदघाटन  ६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार निवास येथे होणार आहे. यावेळी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या : कारणे व उपाय’ विषयावर प्रश्नोत्तरे व गटचर्चा होणार आहे. दुपारी २ वाजता ‘शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या’ विषयावर गटचर्चा तर दुपारी ४ वाजता ‘कमाल जमीन धारण कायदा’ विषयावर अमर हबीब यांचे व्याख्यान होईल. ७ जानेवारीला जमीन अधिग्रहण कायदा व अन्य शेतकरीविरोधी कायदे या विषयावर अ‍ॅड. महेश भोसले यांचे व्याख्यान तसेच ‘आवश्यक वस्तूंचा कायदा’ या विषयावर जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांचे व्याख्यान होणार आहे. विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून राज्यभरातून शेतकरी येथे सहभाग होणार आहेत.

Web Title: Need to amend land acquisition Act: Amar Habib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर