शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नागपूर विमानतळाजवळील २२ इमारतींवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 10:48 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २२ इमारतींना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) सन २०१५ पर्यंत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आता विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) परत मागितले आहे.

ठळक मुद्देएमआयएलची नोटीसएएआय अधिकाऱ्यांचे मौनजिओग्राफिकल सर्वेक्षणात त्रुटी

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २२ इमारतींना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) सन २०१५ पर्यंत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आता विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) परत मागितले आहे. या संदर्भात एमआयएलने संबंधित इमारतींचे बिल्डर आणि सोसायटीच्या सचिवांना नोटिसा दिल्या आहेत.सन २०१८ मध्य नागरी उड्ड्यण मंत्रालयाची अधिसूचना आणि नवीन कायदा जीएसआर ७५१ (ई) अंतर्गत विमानतळ ऑपरेटरला एरोनॉटिकल ऑब्स्टिकल्सचे नियंत्रण करण्याची जबाबदारी दिली होती. यासह विमानांचे ये-जा होताना प्रभावित करणाऱ्या इमारतींच्या एनओसीच्या संदर्भात नवीन निर्देश जारी केले होते. उंचीची काही मर्यादा वाढविली होती. या संदर्भात एएआयने वर्कशॉप आणि एमआयएलने जागरुकता कार्यक्रम राबविले होते. त्यानंतर एमआयएलने मान्यताप्राप्त एजन्सीकडून इमारतींचे सर्वेक्षण केले होते.त्यांच्या अहवालाद्वारे या इमारतींना नोटीस जारी करण्यात येत आहे.एअरपोर्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएआयने सन २०१५ पर्यंत एनओसी दिली आणि १ जानेवारी २०१६ ला एमआयएलला सांगितले की आता या कामाची जबाबदारी त्यांची आहे. एनओसी जारी करणे आणि रद्द करण्याची जबाबदारी एएआयची आहे, पण त्याची निगराणी विमानतळ ऑपरेटर करेल, असे कायद्यात स्पष्ट केले आहे. खासगीकरणानंतर या प्रकरणी नव्याने वाद उद्भवू शकतो. नोटीस दिलेल्या इमारती हिंगणा आणि सोनेगांव परिसरात आहे. यामध्ये तीन निर्माणाधीन आणि तीन जुन्या आहेत. पूर्वी सहा इमारतींना नोटीस देण्यात आले आहे तर १० इमारतींची एनओसी रद्द करण्यात आली आहे. पूर्वी कारवाई करण्यात आलेल्या विमानतळासमोरील प्रोझोन पाम इमारतींचे संचालक दुसऱ्यांदा नागरी उड्डयण मंत्रालयाकडे अपील करण्याच्या तयारीत आहे. तर जयताळा येथील ‘रेणुका एन्क्लेव्ह’चे बिल्डर अपील करणार आहे.

नवीन प्रकरणात त्रुटीजबाबदारी मिळाल्यानंतर आणि सर्वेक्षण केल्यानंतर एमआयएलची चमू सर्वेक्षणात सहभागी इमारतींच्या तपासणीसाठी साईटवर जात आहे. तपासणीत डीजीपीएस व टॉटल स्टेशन उपकरणांच्या माध्यमातून सत्यस्थिती पाहत आहे. पूर्वी कशाप्रकारच्या सर्वेक्षण अहवालाला मान्यता देण्यात आली आणि एनओसी देण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संदर्भात एएआयच्या विमानतळ संचालकांसोबत संपर्क होऊ शकला नाही. आता नव्याने एनओसी मंजूर करण्यासाठी ऑब्स्टिकल मॉनिटरिंग ग्रुप तयार केला आहे. यामध्ये एएआयसह एमआयएल आणि अन्य एजन्सीचा समावेश आहे.

शुल्काच्या भागीदारीवरून होणार वादविमातळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएल साईटवर जाऊन तपासणी करीत असल्यामुळे एनओसीकरिता मिळणाऱ्या शुल्कात एमआयएल भागीदारी मागू शकते. खासगी भागीदार आल्यानंतर नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर