शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून संघाचा निषेध

By admin | Updated: January 31, 2015 02:22 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा गोडवा गाणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज ...

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा गोडवा गाणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हेरायटी चौकात निषेध करण्यात आला. यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले.महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने हत्या केली होती. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि संघटनांनी सुरू केला आहे. याचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले. त्यांनी दीड तास आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले. यावेळी गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गोडवा गाणाऱ्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहीर निषेध असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नथुराम गोडसेचे पुतळे उभारून गांधी हत्येचा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्याच्या हालचाली काही संघटनांनी सुरू केल्यामुळे हे आंदोलन केल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. आंदोलनात माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी शहराध्यक्ष दिलीप पनकुले, प्रदेश महासचिव शब्बीर अहमद विद्रोही, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक राजू नागुलवार, महिला शहर अध्यक्ष नुतन रेवतकर, रमेश फुले, अनिल अहिरकर, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, कामिल अन्सारी, बंडू उमरकर, विशाल खांडेकर, मोहन खानचंदानी, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, अशोक काटले, दिनकर वानखेडे, रिजवान अन्सारी, तनुज चौबे, वर्षा शामकुळे, लोकेश बोबडे, सतीश शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मूक आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देऊन व्हेरायटी चौक दणाणून टाकला. (प्रतिनिधी)