शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Updated: June 16, 2015 02:46 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही ती सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडली आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही ती सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १६ जून रोजी संविधान चौकात दुपारी १२ ते ४ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. अनिल देशमुख यांनी सांगितले की, जिल्हा बँकेचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास २५० कोटी रुपयांचे पीक कर्ज खरीप हंगामाकरिता वाटपाचा बँकेचा मानस होता. परंतु बँकेचे व्यवहार सुरू करण्याची परवानगी न मिळाल्याने आता शेतकऱ्यांना कर्जवाटप होऊ शकणार नाही. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. कर्जाची परतफेड करणाऱ्यांना मागील वर्षी कर्ज मिळालेच नाही. यावर्षीही मिळणार की नाही हे अद्यापही सांगणे कठीण आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे वाटप शेतकऱ्यांना सुरू असले तरी त्यांची पद्धत जटील असल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या नागपूरचेच असल्याने त्यांनी याकडे स्वत: लक्ष देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लवकरात लवकर सुरू होण्यासाठी जे काही पैसे लागतात ते सरकारने भरावे व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली. पत्रपरिषदेला आ. प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेवक राजू नागुलवार, बंडोपंत उमरकर, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)