नाट्य परिषदेचे वर्धापनदिन पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST2021-04-13T04:07:29+5:302021-04-13T04:07:29+5:30

- लक्ष्मीकांत देशपांडे यांना जीवनगौरव तर अनिरुद्ध वनकर यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल ...

Natya Parishad's anniversary award announced | नाट्य परिषदेचे वर्धापनदिन पुरस्कार जाहीर

नाट्य परिषदेचे वर्धापनदिन पुरस्कार जाहीर

- लक्ष्मीकांत देशपांडे यांना जीवनगौरव तर अनिरुद्ध वनकर यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा वर्धापनदिन व पुरस्कार सोहळा १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा जाहीर न होता मर्यादित संख्येत शाखेच्या कार्यालयात पार पडणार आहे. त्या अनुषंगाने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नाटककार लक्ष्मीकांत देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोबतच ज्येष्ठ अभिनेता देवेंद्र दोडके यांना देवाशिष रॉय स्मृती श्रेष्ठ रंगकर्मी, मृणाल पुराणिक यांना भाऊसाहेब सप्रे स्मृती ज्येष्ठ रंगकर्मी, श्याम पेठकर यांना राम गणेश गडकरी स्मृती सर्वोत्कृष्ट लेखक, चारुदत्त जिचकार यांना कुसुमताई भुसारी स्मृती रंगसेवा पुरस्कार, दिलीप वढे यांना सुमंत गडेकर स्मृती झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी, अनिरुद्ध वनकर यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी तर राम भाकरे यांना दिनकर देशपांडे स्मृती नाट्य समीक्षा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारर्थींना हे पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन प्रदान करण्यात येणार आहेत.

....................

Web Title: Natya Parishad's anniversary award announced