शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाला अनुकूल ‘लिटिल वूड’

By admin | Updated: June 5, 2017 01:57 IST

महामेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत निसर्गाला अनुकूल रचनात्मक कार्य करण्यात येत आहेत.

मेट्रो रेल्वेतर्फे २४ हेक्टरवर वृक्षारोपण :जागतिक पर्यावरण दिनी कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत निसर्गाला अनुकूल रचनात्मक कार्य करण्यात येत आहेत. त्यानुसार महामेट्रोने लिटील वूड प्रकल्पाची सुरुवात करताना एक वर्षांपूर्वी टी-पार्इंटजवळील अंबाझरी तलावाच्या काठावर वन विभागाच्या जागेवर ५५०० झाडे लावली आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी रविवारी सकाळी वृक्षांची पाहणी केली.वन विभागाच्या जागेवर विविध प्रजातीची जवळपास ५५०० झाडे लावली आहेत. ज्या वृक्षांची वाढ होणार नाही, त्या ठिकाणी दुसरे वृक्ष लावण्यात येत आहेत. या वन क्षेत्रात आता पक्ष्यांचा वावर आहे. प्रकल्पासाठी कापण्यात आलेल्या वृक्षांच्या तुलनेत पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी महामेट्रोने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. लोकवस्तीत वास्तविक वन साकार करण्याचा संकल्प केला आहे. जागतिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर लिटिल वूड येथे रविवारी आयोजित समारंभात दीक्षित यांनी विचार व्यक्त केले. २४ हेक्टर जागेवर वनक्षेत्र तयार होत आहे. नैसर्गिक वातावरण नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. या क्षेत्रात वास्तविक कलेवर भर दिला आहे. याशिवाय वॉकिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक राहणार आहे. त्याचा फायदा सकाळ व सायंकाळ लहान मुले आणि नागरिकांना होणार आहे. अंबाझरी तलावाच्या काठावर हिरवेगार वनक्षेत्र लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कार्यक्रमादरम्यान दीक्षित यांनी परिसरातील वृक्षांचे निरीक्षण केले. वृक्ष वाढीसाठी ठिंबक सिंचनाची सोय आहे. वनक्षेत्रात विविध पक्ष्यांची चहलपहल वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यात वनक्षेत्राला फायदा होणार आहे. स्केटिंगच्या मुलांना प्रमाणपत्रकाही दिवसांपूर्वी पर्यावरणाचा संदेश देत मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क येथील माहिती केंद्रापासून ९८ मुले स्केटिंग करीत मेट्रो रेल्वेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात पोहोचली होती. नेतृत्व स्वप्नील समर्थ यांनी केले होते. कार्यक्रमात बृजेश दीक्षित यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करून प्रमाणपत्र देण्यात आले. ही मुले मेट्रोच्या चारही बाजूने स्केटिंगने जावीत, असे दीक्षित म्हणाले.मिहानमधील इको पार्कमध्ये वृक्षारोपणमहामेट्रो रेल्वेला डेपोसाठी मिहानमध्ये २६ हेक्टर जागा मिळाली आहे. ही जागा जवळपास ८० मीटर रुंद आणि तीन कि़मी. लांब आहे. रविवारी दीक्षित यांच्या हस्ते पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. १३ एकर जागेवर इको पार्क विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय अ‍ॅग्रो टुरिझम, इकॉनॉमिक झोन, इको पार्क स्टेशन, मनोरंजन झोन, लॉन, क्लब हाऊस, स्वतंत्र रस्ता, खेळांसाठी अंतर्गत व बाहेर खेळांची सोय तसेच रेल्वे धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी झाडांना देण्यात येणार आहे. आर्किटेक्ट काम करीत आहेत. इको पार्कचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे मेट्रोचे संदीप बापट यांनी सांगितले. यावेळी महामेट्रोचे वित्त संचालक शिवमाथन, उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क व समन्वयक) शिरीष आपटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.