National Inter Religious Conference: संयम आणि आभार मोठी अध्यात्मिक शक्ती - सलमान चिश्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 02:52 PM2021-10-24T14:52:56+5:302021-10-24T14:56:42+5:30

National Inter Religious Conference: ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी भाष्य केले.

National Inter Religious Conference: : Patience and gratitude is a great spiritual power - Haji Syed Salman Chishty | National Inter Religious Conference: संयम आणि आभार मोठी अध्यात्मिक शक्ती - सलमान चिश्ती

National Inter Religious Conference: संयम आणि आभार मोठी अध्यात्मिक शक्ती - सलमान चिश्ती

googlenewsNext

नागपूर : संयम आणि आभार आपली सर्वात मोठी अध्यात्मिक शक्ती आहे. आपण संयम राखल्यामुळे जगातील मोठी आव्हाने आमच्यासमोर आली. मात्र ती आम्हाला हरवू किंवा संपवू शकली नाहीत. आम्ही संयमाने जगू शकतो हेच कोरोना काळात पाहायला मिळाले, असे अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी सांगितले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत अजमेर शरीफ दर्गाचे गद्दीनशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या भारताकडून एकतेचा आणि माणुसकीचा हा संदेश आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही देत आहोत. दोन वर्षापासून संपर्ण जग एका लाकडाऊनमधून गेले आहे. आजचा हा आपला एक फिजिकल कार्यक्रम आहे. याठिकाणी आमचे गुरूजन बसले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही ऑनलाइन पर्यावरणाच्या मुद्दावर चर्चा केली आहे. मात्र, दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर ही पहिली संधी आहे की, आम्ही सर्व एकत्र भेटत आहोत.

लाकडाऊनदरम्यान दोन वर्षात लोकांमध्ये जो दुरावा निर्माण झाला आहे. लोक एक दुसऱ्यांजवळ उभे राहण्यास संकोच करत आहेत. लोकांच्या मनात भीती होती. ती भीती आता दूर होत आहे. भारतासमोर कोरोनादरम्यान जी आव्हाने होती, ती आता संपली आहेत. भीती दूर झाली आहे. दर्गा अजमेर शरीफमध्ये लोक येत आहेत. आम्ही पाहिले की, ज्यापद्धीने घरात राहून लोकांवर एक लॉजिकल परिणाम झाला होता. मात्र आता मशिद, मंदिर आणि गुरुद्वारामध्ये लोक जात आहेत. त्यामुळे लोकांची भीती दूर होत आहे, असे हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.

याचबरोबर, मी सलाम केला. सलाम याचा अर्थ आहे शांती. हाच संदेश आपण सामान्य जनतेसाठी देऊ इच्छितो. आपल्या भारताकडे एक शांततेची ताकद आहे. तसेच,  संयम आणि आभार आपली सर्वात मोठी अध्यात्मिक शक्ती आहे. आपण संयम राखल्यामुळे जगातील मोठी आव्हाने आमच्यासमोर आली. मात्र ती आम्हाला हरवू किंवा संपवू शकली नाहीत. आम्ही संयमाने जगू शकतो हेच कोरोना काळात पाहायला मिळाले, हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले.

Web Title: National Inter Religious Conference: : Patience and gratitude is a great spiritual power - Haji Syed Salman Chishty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.