सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 14:18 IST2023-02-18T14:17:20+5:302023-02-18T14:18:07+5:30

तयारीच्या अनुषंगाने पार पडली सभा

National Convention of Saitwal Jain Samaj to be held on April 15-16 at Nagpur | सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन

सैतवाळ जैन समाजाचे १५-१६ एप्रिलला नागपुरात राष्ट्रीय महाअधिवेशन

नागपूर : अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेच्या नियोजनात सैतवाळ जैन समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन नागपुरात होणार आहे. अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन नखाते यांनी ही माहिती दिली. अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात महाविरनगर येथील श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री सैतवाळ जैन संघटन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वेखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

१५ व १६ एप्रिलला सैतवाळ जैन समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असल्याचे नितीन नखाते यांनी सांगितले. यापूर्वीचे अधिवेशन आळंदी येथे पार पडले होते. नागपुरात होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अधिवेशनात श्री सैतवाळ जैन संघटन मंडळातून जिनवाणी दिंडी काढली जाईल. हे अधिवेशन सहा सत्रांत पार पडेल. राष्ट्रीय अधिवेशनाचे अस्थाई कार्यालय श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ, ग्रेट नाग रोड, एस. डी. हॉस्पिटलच्या जवळ महावीरनगर येथे असणार असल्याचे चंद्रकांत वेखंडे यांनी सांगितले.

विविध समित्यांचे नियोजन

अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींच्या निवास, भोजनाची व्यवस्था नागपूर समाजाकडून केली जाणार आहे. अधिवेशनासाठी विविध समित्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यात नागपूर व विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येतील. अधिवेशनासाठी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे, राष्ट्रीय महामंत्री मुकुंद वालचाले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजयकुमार लुंगाडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

सभेमध्ये पुलक मंच परिवारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाळ)चे अध्यक्ष विनय सावळकर, महावीर यूथ क्लबचे अध्यक्ष दिनेश सावळकर, श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैतवाळ मंदिरचे महामंत्री दिलीप राखे, महावीर यूथ क्लबचे सचिव प्रशांत मानेकर, अखिल दिगंबर जैन संस्था पश्चिम नागपूरचे सचिव अरविंद हनवंते, श्री जैन सेवा मंडळचे अध्यक्ष शरद मचाले, बाहुबली नगर जैन मंदिरचे सचिव सुरेश वरूडकर, अंबानगर जैन मंदिरचे सचिव पद्माकर बुलबुले, प्रतिभा नखाते यांनी आपले विचार मांडले. संचालन श्री सैतवाळ जैन संघटन मंडळत्तचे सचिव प्रकाश मारवडकर यांनी केले. यावेळी डॉ. रवींद्र भुसारी, प्रशांत सवाने, विजय उदापूरकर, दिलीप सावळकर, प्रशांत भुसारी, श्रीकांत तुपकर, राजेश फुलंबरकर, नीरज पळसापुरे, प्रमोद भागवतकर, राजेश जैन, नरेश मचाले, श्रीकांत तुपकर, उमेश फुलंबरकर, अमोल भुसारी, अतुल महात्मे, अविनाश शहाकार, सुभाष मचाले, शरद वेखंडे, प्रवीण भेलांडे, सुधीर सिनगारे, अमोल बंड, विशाल मानेकर, राजेंद्र सोनटक्के, कुणाल गडेकर, बाहुबली पळसापुरे, मनीष गिल्लरकर, नीलेश घ्यार, योगीता गडेकर, मनीषा सावलकर, जयश्री भुसारी, भारती उबाले, सुरेखा नेटके उपस्थित होते.

Web Title: National Convention of Saitwal Jain Samaj to be held on April 15-16 at Nagpur