शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

राष्ट्रीय ग्राहक आयोग : मेडिकल, सुपरला ३० लाख रुपये भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 8:05 PM

एचसीएल इन्फोसिस्टम्स व इतर दोन संबंधित कंपन्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला ३० लाख रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज अदा करावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.

ठळक मुद्दे‘एचसीएल’ला आदेश : सहा टक्के व्याजही मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटलायझेशन कराराचे काटेकोर पालन करण्यात अपयशी ठरलेल्या एचसीएल इन्फोसिस्टम्स व इतर दोन संबंधित कंपन्यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला ३० लाख रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज अदा करावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. ३० लाख रुपये भरपाईवर आयोगातील तक्रारीच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष भरपाई अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी एचसीएल कंपन्यांना ४५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.राज्य सरकारने मेडिकल व सुपरस्पेशालिटीचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांतर्गत आवश्यक संगणक व सॉफ्टवेअर पुरविण्यासाठी एचसीएल कंपनीला ९८ कोटी रुपयांत कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार एचसीएलने संगणकांचा पुरवठा केला, पण सॉफ्टवेअर दिले नाही. त्याकरिता एचसीएलने नागपुरातील कंपनीशी उपकरार केला होता. त्यानंतरही सॉफ्टवेअर मिळाले नाही. परिणामी, मेडिकल अधिष्ठात्यांनी आयोगात तक्रार दाखल केली. एचसीएलने कराराचे काटेकोर पालन करायला हवे होते. सॉफ्टवेअर पुरवण्याची जबाबदारी एचसीएलची होती. परंतु, त्यांनी कराराचे उल्लंघन केले. त्यामुळे प्रशासनाला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला असे तक्रारीत नमूद करण्यात आले. आयोगाच्या नोटीसनंतर एचसीएल कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:ची बाजू स्पष्ट केली व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा आदेश दिला. मेडिकलतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :consumerग्राहकGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय