शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र सभापतींच्या पीएला मारहाण

By admin | Updated: June 16, 2015 02:48 IST

धार्मिक स्थळाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान नासुप्र कार्यालयातील तोडफोड तसेच सभापतींच्या स्वीय

कार्यालयात तोडफोड : प्रशासकीय वर्तुळात संताप नागपूर : धार्मिक स्थळाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान नासुप्र कार्यालयातील तोडफोड तसेच सभापतींच्या स्वीय सहायकाला मारहाण करण्यात झाले. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, मारहाणीची तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये विचारविमर्श सुरू होता. परिणामी रात्री ११ वाजेपर्यंत अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.त्रिमूर्तीनगर एनआयटी गार्डनमागे असलेल्या प्रियदर्शनीनगरात नासुप्रच्या मालकीची जागा आहे. अनेक वर्षांपासून या जागेचा सार्वजनिक उपयोग होतो. या जागेवर दोन वेगवेगळ्या समाजाचे धार्मिक बांधकाम करण्यात आल्यामुळे दीड महिन्यापूर्वी वाद निर्माण झाला होता. पोलीस तसेच नासुप्रकडे तक्रार झाल्यामुळे येथे स्लॅब टाकण्याचे काम थांबले होते. यानंतर चर्चा आणि बैठका घेऊन दोन्ही गटातील व्यक्तींना समजावण्यात आले आणि त्यावर सामोपचाराने तोडगाही काढण्यात आला. मात्र आता पुन्हा या वादाला तोंड फुटले. विरोधी गटावर कारवाई करावी म्हणून शंभरेक जणांचा जमाव सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास नासुप्रच्या मेट्रोरिजन कार्यालयावर धडकला. त्यांनी तेथे गोंधळ घालून तोडफोड केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भास्कर कांबळे यांना काही महिलांनी धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कार्यालय परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. अंबाझरी आणि प्रतापनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. ते पाहून आरोपी पळून गेले. दरम्यान, मारहाण झालेले कांबळे हे नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांचे स्वीय सहायक असल्याची वार्ता पसरल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी अंबाझरी ठाण्यात पोहचले. मात्र, तक्रार करावी की करू नये, अशी स्थिती असल्यामुळे आम्ही अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे अंबाझरी पोलीस सांगत होते. दरम्यान, नासुप्रचे विभागीय अभियंता पंकज रमेश पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मध्यरात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. (प्रतिनिधी)