शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

नागपूरचे शायर जमाल यांनी तोडला शेरोशायरीचा विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:25 AM

नगरसेवक व शायर मोहम्मद जमाल यांनी सतत १२८ तास शेरोशायरी करीत अखेर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाव नोंदविले. शनिवारी रात्री ७.४५ वाजता जमाल यांनी विक्रम करताच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. आयोजक मनीष पाटील व उत्साही मित्रांनी फुलांची माळ घालून हा आनंद साजरा केला.

ठळक मुद्दे१२८ तास केली शायरी : गिनीजसाठी उत्तर नागपुरातून चौथा विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवक व शायर मोहम्मद जमाल यांनी सतत १२८ तास शेरोशायरी करीत अखेर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाव नोंदविले. शनिवारी रात्री ७.४५ वाजता जमाल यांनी विक्रम करताच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. आयोजक मनीष पाटील व उत्साही मित्रांनी फुलांची माळ घालून हा आनंद साजरा केला.संविधान जनजागृतीच्या उद्देशाने रेकार्ड बनविण्याचे ध्येय ठेवत मो. जमाल यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिनी सकाळी ११ वाजतापासून शेरोशायरीला सुरुवात केली. शुक्रवारी पाचव्या दिवशी जमाल यांची प्रकृती बिघडत चालली होती. गळ्यात इन्फेक्शनमुळे आवाज बसला होता. यामुळे आयोजकांचीही चिंता वाढली होती. कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली. जमाल यांचे वजन ४ किलोने घटले होते. शायरी गाण्यास त्रास होत असल्याने आयोजकांनी १०० तासांचा विक्रम करून समोरचा धोका न पत्करण्याचा सल्ला त्यांना दिला. यादरम्यान डॉक्टरांच्या उपस्थितीतच त्यांना उलट्याही झाल्या. यानंतर मात्र थोडे हलके वाटत असल्याचे जमाल यांनी सांगितले आणि पूर्ण १२८ तासांचा विक्रम करण्याचा विश्वास व्यक्त केला व पुन्हा शायरीला सुरुवात केली. अखेर शनिवारी रात्री त्यांनी या विक्रमाची नोंद केली.यापूर्वी झाले हे विक्रमयापूर्वी उत्तर नागपुरातून गिनीज बुकमध्ये सर्वाधिक वेळ बुद्ध-भीम गीत गायन, एकल फिल्मी गीत गायन व सामूहिक गीत गायनाचा विक्रम नोंदविला गेला आहे. शायर जमाल यांचा हा चौथा विक्रम ठरला आहे.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर