नागपुरात  पोलीस निरीक्षकाला भोवली फेसबुकवरील चॅटिंग : तडकाफडकी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:41 PM2019-03-27T23:41:43+5:302019-03-27T23:42:34+5:30

महिला रेडिओ जॉकीसोबत चॅटिंग करून व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करणे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला भोवले. तरुणीने चॅटिंगचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे या अधिकाऱ्याची आज रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. या घडामोडीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur's Police Inspector affect Chatting on Facebook: immediate transfer | नागपुरात  पोलीस निरीक्षकाला भोवली फेसबुकवरील चॅटिंग : तडकाफडकी बदली

नागपुरात  पोलीस निरीक्षकाला भोवली फेसबुकवरील चॅटिंग : तडकाफडकी बदली

Next
ठळक मुद्दे रेडिओ जॉकीच्या तक्रारीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला रेडिओ जॉकीसोबत चॅटिंग करून व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करणे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला भोवले. तरुणीने चॅटिंगचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे या अधिकाऱ्याची आज रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. या घडामोडीमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हा अधिकारी वाहतूक शाखेत प्रभारी सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहे. तक्रार करणारी तरुणी रेडिओ जॉकी म्हणून नागपुरात काम करते. कार्यालयीन कामाच्या निमित्ताने तिला वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांचा संपर्क क्रमांक हवा होता. त्यामुळे तिने तिची ओळख असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याला दुपारी मेसेज करून डीसीपी ट्रॅफिकचा नंबर मागितला. त्याने तिच्याशी चॅटिंग करताना तिला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. तिने कशासाठी विचारले असता तुझा सुंदर चेहरा बघायचा आहे, असे तो म्हणाला. त्यामुळे तरुणी संतप्त झाली. तिने संताप व्यक्त करीत आपल्या फेसकबुकवर पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेली चॅटिंग शेअर केली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. फेसबुक फ्रेण्ड, नेटीझन्सने त्यावर नोंदविलेल्या प्रतिक्रिया आणि नजिकच्या मैत्रिणींनी दिलेल्या सल्ल्यानुसार या तरुणीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रात्री सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला.
तक्रारीची चौकशी
पोलिसांनी हा तक्रार अर्ज तूर्त चौकशीत ठेवला. दरम्यान, ‘चॅटिंग’ व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर या अधिकाऱ्याची आज रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. या संबंधाने सीताबर्डीचे ठाणेदार आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Nagpur's Police Inspector affect Chatting on Facebook: immediate transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.