दुसऱ्या दिवशीही नागपूरकरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:54+5:302021-03-08T04:07:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा शनिवारी व रविवारी बंद पुकारला. रविवारी बंदच्या दुसऱ्या दिवशी ...

Nagpurkar's support even on the second day | दुसऱ्या दिवशीही नागपूरकरांची साथ

दुसऱ्या दिवशीही नागपूरकरांची साथ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा शनिवारी व रविवारी बंद पुकारला. रविवारी बंदच्या दुसऱ्या दिवशी दुकाने, बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद होती. परंतु, गेल्या आठवड्यापेक्षा यावेळी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे बंदला नागपूरकरांचा प्रतिसाद कायम असला तरी, तो या आठवड्यात संमिश्र राहिल्याचे दिसून आले. दुकान, बाजार, मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट आदी सर्वच बंद होते. सदर, गोकुळपेठ, सीताबर्डी, महाल, इतवारी, जरीपटका, कमाल चौक, मोमीनपुरा आदी नागपुरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याने येथे सामसूम होती.

गेल्या आठवड्यात बंदच्या दोन्ही दिवशी रस्त्यावरची वर्दळ नाममात्र होती. परंतु, या आठवड्यात मात्र काही लोक थोडे बेफिकीर झाल्याचे दिसून आले. गत आठवड्याच्या तुलनेत यावेळी दोन्ही दिवशी रस्त्यांवर वाहनांनी वर्दळ थोडी वाढलेली होती. नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यासाठी प्रशासनाने शनिवार-रविवार बंदचे आवाहन केले आहे. नागरिकांकडून आणि व्यापाऱ्यांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ काही लोकांमुळे याला गालबोट लागत आहे, तेव्हा सर्वांनीच ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---

Web Title: Nagpurkar's support even on the second day