शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

कडाक्याच्या थंडीत नागपूरकरांनी अनुभवली माणुसकीची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 8:24 PM

आशिष अतकरी या युवकाचा अभिनव उपक्रम  

नागपूर: सध्या  थंडी खूप वाढली  आहे, लहान मुले, घरातील वृद्ध यांच्यासह घरातल्या पाळीव प्राण्यांनाही या  बोचऱ्या कडाक्याच्या थंडीत आपल्या कुटुंबातील सर्व जण एकमेकांची काळजी घेतातच, स्वेटर, मफलर, शाल, हातमोजे आणि झोपताना ब्लॅंकेट आवर्जून वापरात आणले जात आहेत. 

घरातील माणसांची  काळजी तर सगळेच घेतात पण रस्त्यावर, फुटपाथवर आपल्यासारखीच  हाडामासाची माणसे या कुडकुडणाऱ्या  थंडीतही तशीच अंगावरच्या कपड्यावरच  झोपी जाताना दिसतात. पुरेशा पैशाच्या अभावामुळे हलाखीचे जगणे  जगताना जिथे दोन वेळच्या  जेवणाची  भ्रांत  तिथे  थंडीपासून  बचाव  करण्यासाठी  ऊबदार  ब्लॅंकेट  मिळणे ही  तर अवघड आणि  अशक्य  बाब, मात्र हे सगळे जाणवून मनात हळहळ  व्यक्त करून थांबण्यापेक्षा  आपल्याला स्वतःला  काहीतरी  करता  आले तर, अगदी याच विचाराने नागपूरमधील  आशिष  अतकरी  या तरुणाने  स्वतःच्या  कमाईतून  या रस्त्यावरच्या उघड्यावर संसार  थाटलेल्यांना  माणुसकीची ऊब  मिळावी म्हणून  ब्लॅंकेट  देण्याचा निर्णय  घेतला आणि त्याच्या या विचाराला कृतीची  साथ देण्यासाठी  गौरव  पेंडके, मंदार धानोरकर, रोहित नागमोटे या मित्रांनीही  मदतीचा  हात  पुढे केला.

 सोशल मीडियावरून  आवाहन  करण्यात  आले  आणि बघता  बघता  तब्बल  अडीचशे  ब्लॅंकेट जमा झाली. हि जमा झालेली  ब्लॅंकेट  एकत्र करून या सर्वांनी नागपूर शहरातल्या साई मंदिर परिसर, गणेश टेकडी परिसर, रेल्वे  स्टेशन,  यशवंत  स्टेडियम, आरबीआय स्क्वेअर,मिठा  निम  दर्गा, हनुमान मंदिर परिसर, राम नगर परिसर, खामला परिसर, महाराज बाग रोड, शनी मंदिर रोड आणि मेयो हॉस्पिटल  परिसर  या भागात  स्वतः जाऊन  गरजू नागरिकांकडे  दिले. त्यामुळे न मागता  मिळालेली  ही  मायेची ऊब  पाहून  त्या गरजवंताच्या  चेहऱ्यावरही माणुसकीचे स्मित हास्य  उमटले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र