शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

नागपूर जि.प. कार्यकारी अभियंत्याची चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 1:00 AM

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांची प्रधान सचिवांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांची प्रधान सचिवांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कर्मचारी संघटनांच्या तक्रारी, गैरव्यवहाराची प्रकरणे व स्वत: प्रधान सचिवांच्या कार्यालयीन आदेशाची अवमानना आदी तक्रारी आहेत. यासाठी विभागाच्या प्रधान सचिवाची विशेष समिती सोमवारी (१६ डिसेंबर) जिल्हा परिषदेत दाखल होणार असल्याची माहिती आहे़दरम्यान, ही समिती कार्यकारी अभियंता टाकळीकर यांच्या कालखंडात झालेल्या सर्व कामांचा विषयनिहाय आढावा घेणार असल्याची माहिती आहे. समितीत स्वत: प्रधान सचिव आणि इतर उपसचिव व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश राहील़ सद्यास्थितीत टाकळीकर यांच्या बदलीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ त्यांची बदली हिंगोलीला झाली होती़ त्यांनी स्वत: शासनाच्याच आदेशाला आव्हान दिले़ त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याच्या अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच ते चौकशी समितीला सहकार्य करीत नाही, मंत्रालयीन अधिकाऱ्यांचाही आदेश पायदळी तुडवितात, असे आरोप त्यांच्यावर आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार, फेटरी येथील विपश्यना केंद्रामधील पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून टाकळीकरांनी थेट सचिवांसोबत हुज्जत घातल्याची चर्चा आहे़ त्यामुळे ही बाब प्रधान सचिवांनी चांगलीच मनावर घेतली़ नागपुरात हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे़ त्यानिमित्त संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा शहरात तळ ठोकून आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठकही सोमवारी प्रस्तावित आहे़ तत्पूर्वी, ही चौकशी समिती टाकळीकरांची पेशी घेईल़ यापूर्वी टाकळीकरांवर मंत्रालयीन चौकशी सुरू आहे़ त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करता एसटी प्रवर्गावर नोकरी बळकावल्याचीही चर्चा जिल्हा परिषदेत आहे़

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर