शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत : प्रस्थापितांना धक्का ; आरक्षणात बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 8:54 PM

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षणात बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.

ठळक मुद्देचव्हाण, कुंभारे, डोणेकर, गेडाम, वर्मा, गायकवाड, देशमुख अडचणीतअध्यक्ष सावरकर, माजी अध्यक्ष गोतमारे अन् माजी उपाध्य चिखले सेफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षणात बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्या उपस्थितीत बचत भवन येथे आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. शाळकरी मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांचे आरक्षणही तालुकास्तरावर काढण्यात आले.तिसऱ्यांदा झालेल्या सोडतीचा फटका वित्त व शिक्षण सभापती उकेश चव्हाण, सभापती दीपक गेडाम, आशा गायकवाड, सत्तापक्षनेते जयकुमार देशमुख, विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, ज्येष्ठ सदस्य जयकुमार वर्मा, शिवकुमार यादव, रूपराव शिंगणे यांच्यासह जिल्हा परिषदेतील मातब्बरांना बसला आहे. कुठे महिलांसाठी तर कुठे अनुसूचित जाती वा जमातीसाठी सर्कल आरक्षित झाल्याने निवडणुकीतून बाद होण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष निशा सावरकर व माजी अध्यक्ष संध्या गोतमारे, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले आदींचे मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच सेफ राहिले. तर विद्यमान उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या सर्कलमधील कन्हान नगरपरिषद झाली आहे. एक गाव जि.प.मध्ये कायम राहिल्याने त्यांचे सदस्यत्व कायम होते. त्यांना निवडणुकसाठी नवीन सर्कल शोधावे लागणार आहे. प्रस्थापितांचे मागील सोडतीतच सर्कल आरक्षित झाले होते. मात्र तिसºया सोडतीत दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. काटोल तालुक्यातील मेटपांजरा मागील सोडतीत सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाले होते. यामुळे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले अडचणीत आले होते. मात्र नवीन सोडतीत त्यांचे सर्कलचा सर्वसाधारण गटात समावेश करण्यात आला. मनोहर कुंभारे यांचे तेलकामठी सर्कल अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे.उकेश चव्हाण व शिवकुमार यादव यांचे टेकाडी सर्कल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने दोघांनाही दुसरे सर्कल शोधावे लागणार आहे. जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांचे धानला सर्कल सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले. तर लगतचे तारसा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी राखीव निघल्याने सावरकर यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.येरखेडा सर्कल सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना इच्छा असल्यास लढण्याची संधी प्राप्त झाली आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कल सर्वसाधारण गटासाठी असल्याने जि.प.सदस्य उज्ज्वला बोढारे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. माजी अध्यक्ष संध्या गोतमारे यांना निलडोह व डिगडोह सर्क लमध्ये लढण्याची संधी कायम आहे. गोधनी रेल्वे ओबीसी महिलासाठी राखीव झाल्याने माजी सदस्य कुंदा राऊ त यांना निवडणूक लढण्याची संधी निर्माण झाली आहे. उमरेडमध्ये सिर्सी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. सर्कलच्या पुनर्रचनेत बदल झाल्यानंतरही सदस्यांना काही तरी अपेक्षा होती. परंतु आरक्षणाच्या सोडतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला. मात्र मौदा तालुक्यातील दोन सर्कल सर्वसाधारण तर एक ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने, माजी सदस्य देवेंद्र गोडबोले यांना लढण्याची संधी मिळणार आहे.सभापती दीपक गेडाम यांचे सावनेर तालुक्यातील चिचोली सर्कलमध्ये पहिल्या सोडतीत सर्वसाधारण(महिला)साठी राखीव झाले होते. दुसऱ्या सोडतीत आता अनु. जमाती(महिला)साठी राखीव झाले. तिसऱ्या सोडतीत हेच आरक्षण कायम ठेवण्यात आले.कामठीत फेरबदल, कंभालेंना दिलासाकामठी तालुक्यात नव्याने झालेल्या कोराडी सर्कलमध्ये निघालेले जुने आरक्षण हे खुल्या गटातील होते. त्यामुळे विद्यमान सदस्य नाना कंभाले यांनी जोर लावला होता. परंतु आरक्षणाच्या दुसऱ्या सोडतीत हे सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. तिसऱ्या सोडतीत सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निघाल्याने कंभाले यांना दिलासा मिळाला आहे.नवीन चेहऱ्यांना संधीसर्कलच्या पुनर्रचनेत आणि जुन्या-नवीन आरक्षणाच्या सोडतीत मोठे फेरबदल झालेले आहेत. प्रस्थापितांना लढण्यासाठी सर्कल नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणातून बाद व्हावे लागणार आहे. मात्र सोडतीमुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तसेच काही जुन्या सदस्यांनाही संधी मिळणार आहे. मेटपांजरा सर्कल सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने माजी सदस्य दीप्ती काळमेघ यांना निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली आहे.निवडणुकीबाबत उलटसुलट चर्चालोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच कोराडी व खापरखेडा दोन नगर परिषदांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीला न्यायालयात आव्हान दिले जाईल. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील, अशी जि.प.मध्ये उलटसुलट चर्चा आहे.जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जि.प. सर्कलनिहाय आरक्षणतालुका        सर्कल               आरक्षणनरखेड :        बेलोना           अनुसूचित जाती महिला                      सावरगाव      ना.मा प्र. महिला                      जलालखेडा     अनुसूचित जमाती                      भिष्णूर             ना.मा प्र. महिलाकाटोल :           येनवा            ना.मा.प्र.                       पारडसिंगा      ना.मा.प्र.                      मेटपांजरा       सर्वसाधारण                     कोंढाळी          सर्वसाधारण महिलाकळमेश्वर :    तेलकामठी        अनुसूचित जमाती महिला                      धापेवाडा            अनुसूचित जाती                    ब्राम्हणी (गोंडखैरी)    अनुसूचित जमातीसावनेर :        बडेगाव                सर्वसाधारण महिला                     वाकोडी              ना.मा.प्र.महिला                    केळवद                  ना.मा.प्र.                  पाटणसावंगी         अनुसूचित जाती महिला                   वलनी                    सर्वसाधारण                  चिचोली               अनुसूचित जमाती महिलापारशिवनी : माहुली                सर्वसाधारण                  करंभाड               ना.मा.प्र. महिला                  गोंडेगाव               सर्वसाधारण                  टेकाडी              अनुसूचित जाती महिलारामटेक : पथरई-वडंबा          सर्वसाधारण                बोथीयापालोरा           ना.मा.प्र.                कांद्री                     सर्वसाधारण                 मनसर             अनुसूचित जाती महिला                नगरधन              सर्वसाधारणमौदा : अरोली                    ना.मा.प्र.           खात                     सर्वसाधारण महिला            चाचेर                   सर्वसाधारण             तारसा                 सर्वसाधारण महिला            धानला                  सर्वसाधारणकामठी : कोराडी             सर्वसाधारण               येरखेडा             सर्वसाधारण              गुमथळा               ना.मा.प्र.              वडोदा              ना.मा.प्र. महिलानागपूर : गोधनी रेल्वे       ना.मा.प्र. महिला              दवलामेटी          सर्वसाधारण             सोनेगाव निपाणी    अनु. जाती महिला                 खरबी               अनु.जाती                 बेसा                  अनु. जाती महिला            बोरखेडी फाटक      सर्वसाधारण महिलाहिंगणा : रायपूर                   सर्वसाधारण              निलडोह               ना.मा.प्र.              डिगडोह                ना.मा.प्र. महिला              डिगडोह इसासनी   ना.मा.प्र. महिला             सातगाव                 अनु.जमाती महिला             खडकी                   सर्वसाधारण महिला             टाकळघाट             अनु.जातीउमरेड : मकरधोकडा         सर्वसाधारण महिला              वायगाव                सर्वसाधारण महिला             बेला                     सर्वसाधारण महिला             सिर्सी                   सर्वसाधारण महिलाकुही : राजोला                   ना.मा.प्र.            वेलतूर                  सर्वसाधारण महिला             सिल्ली                सर्वसाधारण महिला             मांढळ                सर्वसाधारण महिलाभिवापूर : कारगाव           अनु. जमाती                नांद                  अनु. जाती महिलाएकूण मतदारसंघ ५८अनुसूचित जाती ५अनु. जाती (महिला) ५अनुसूचित जमाती ३अनु. जमाती (महिला) ४ना.मा.प्र. ८ना.मा.प्र. (महिला) ८सर्वसाधारण १३सर्वसाधारण (महिला) १२

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक